*वडदहसोळ मिरजोळकरवाडीत आई श्री जाकादेवी मंदिरात भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वडदहसोळ मिरजोळकरवाडीत आई श्री जाकादेवी मंदिरात भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन*
*वडदहसोळ मिरजोळकरवाडीत आई श्री जाकादेवी मंदिरात भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षी सुद्धा आई श्री जाकादेवी मंदिर, मिरजोळकरवाडी, वडदहसोळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 11 ऑक्टोबर 2026 रोजी पहिल्या दिवशी देवी-देवतांना मुखवटे लावून विधीवत पूजा करून उत्सवाला सुरवात करण्यात आली. या निमित्ताने वाडीतील ग्रामस्थांतर्फे दररोज पुजा आरती तसेच रात्री भजन, गरबा डान्स करून देवीच्या मंदिरात जागरण केले जाते. सलग नऊ दिवस नऊ माळा अर्पण केल्या नंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. त्या दिवशी लहान-थोर मंडळी एक मेकांना सोने (आपट्याची पाने) देऊन शुभेच्छा देतात व दुसऱ्या दिवशी उत्सवाची सांगता केली जाते. वाडीचे गावकर सुरेश दादु मिरजोळकर, चंद्रकांत गुणाजी म्हादये, दिनेश गंगाराम पळसमकर यांच्या देखरेखीखाली हा नवरात्रौत्सव उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येतो.



