*धडगाव तालुक्यातील पिंपळबारी ग्रामसभेला अधिकारी गैरहजर, शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करणार-इंजि. राकेश पाडवी,आमंत्रण देऊनही अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचा à¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धडगाव तालुक्यातील पिंपळबारी ग्रामसभेला अधिकारी गैरहजर, शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करणार-इंजि. राकेश पाडवी,आमंत्रण देऊनही अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचा à¤
*धडगाव तालुक्यातील पिंपळबारी ग्रामसभेला अधिकारी गैरहजर,शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करणार-इंजि.राकेश पाडवी,आमंत्रण देऊनही अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप;पिंपळबारीत समस्या ऐरणीवर*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळबारी अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रीतसर आमंत्रण देऊनही संबंधित विभागांचे अधिकारी ग्रामसभेला उपस्थित राहत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या सेवा पुस्तकात तशी नोंद करण्यात यावी, याकरिता वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा व पत्रव्यवहार करणार असल्याचे युवा क्रांती आयटी सेलचे प्रमुख इंजिनिअर राकेश पाडवी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. धडगाव तालुक्यातील पिंपळबारी येथे आयोजित ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, गावातील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महसूल यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित शासकीय अधिकारी गैरहजर राहिले. अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ग्रामसभेत केवळ ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच आपापसात चर्चा करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, या ग्रामसभेत युवा क्रांती आयटी सेलचे प्रमुख इंजिनिअर राकेश पाडवी यांनी विशेष उपस्थिती लावून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. त्यांनी दुर्गम भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्या आणि दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या. या वेळी गावातील रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच इतर विकासकामांशी संबंधित विविध गंभीर समस्या निदर्शनास आल्या. ग्रामसभेत संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित नसल्यामुळे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना आपल्या तक्रारी आणि अडचणी थेट जबाबदार अधिकाऱ्यांसमोर मांडता येत नाहीत. परिणामी, प्रशासकीय पातळीवर समस्यांवर वेळेत कार्यवाही होत नाही आणि ग्रामस्थांना सरकारी कार्यालयांचे खेटे मारावे लागतात. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला तात्काळ आळा घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पत्रकारांशी बोलताना इंजि. राकेश पाडवी म्हणाले की, "ग्रामसभा हे लोकशाहीचे आणि स्थानिक स्वराज्याचे अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अधिकारी जर या सभेला गैरहजर राहत असतील, तर तो ग्रामस्थांचा आणि लोकशाही व्यवस्थेचा थेट अवमान आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्या सेवा पुस्तकात (सर्व्हिस बुक) तशी नोंद केली जावी, यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व विभागांशी पत्रव्यवहार केला जाईल."शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामसभेला प्रत्यक्ष आणि नियमित उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांवर वेळेत तोडगा काढावा, जेणेकरून धडगाव तालुक्यातील पिंपळबारी परिसरातील विकासकामांना गती मिळेल, अशी ठाम अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.



