*दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना*
*दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांवरील संकट दूर करून त्यांना समृद्ध करण्याची प्रार्थना शिवसेनेचे नेते, आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी शनिदेवांचेरणी केली. शनी अमावस्या निमित्त नंदुरबार तालुक्यातील साडेसाती मुक्तीपीठ असलेल्या श्रीक्षेत्र शनिमांडळ येथे शनि महाराजांचे दर्शन आ. रघुवंशींनी घेतले.
यंदा कमी झालेल्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यासह सर्वत्र दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळामुळे बळीराजावर अस्मानी सुलतानी संकट ओढवलेले आहे. दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकऱ्यांच्या सुख -समृद्धीसाठी शिवसेनेचे नेते, आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी श्रीक्षेत्र शनिमांडळ येथे शनि महाराजांचे दर्शन घेत पूजा आरती करून साकडे घातले. याप्रसंगी शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन ठाणसिंग गिरासे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



