*बिलाडी धरणाच्या बांधकामामुळे,नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील खामगांव गावाचे पुनर्वसन करणे,संदर्भात बैठक लावणेबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना,विधान परिषदेचे आमदार चंद
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिलाडी धरणाच्या बांधकामामुळे,नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील खामगांव गावाचे पुनर्वसन करणे,संदर्भात बैठक लावणेबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना,विधान परिषदेचे आमदार चंद
*बिलाडी धरणाच्या बांधकामामुळे,नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील खामगांव गावाचे पुनर्वसन करणे,संदर्भात बैठक लावणेबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना,विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कायम दुष्काळी परिस्थिती असलेल्या नंदुरबार तालुक्यातील तापी -बुराई उपसा सिंचन योजनेतील अपूर्ण असलेले व पुढील उर्वरीत कामांना गती देऊन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी व लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत बिलाडी धरणाच्या बांधकामामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील खामगांव गावाचे पुनर्वसन करणे संदर्भात बैठक लावणेबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निवेदन. कायम दुष्काळी परिस्थिती असलेल्या नंदुरबार तालुक्यात महाराष्ट्र शासनाने तापी- बुराई उपसासिंचन योजना मंजुर केलेली असुन, या योजनेमधील कामे ही अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. पूर्व पट्टा म्हणजे रनाळे, शनिमांडळ या महसुली भागासह संपूर्ण नंदुरबार तालुक्यात अत्यंत कमी पाऊस होत असल्यामुळे कायम दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. तापी -बुराई उपसा सिंचन योजनेतील पहिल्या टण्याचे काम पूर्ण झाल्यास नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील शनिमांडळ पर्यंत पाईपलाईनद्वारे योजनेत असलेल्या तलावांमध्ये पाणी टाकले गेल्यास, गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणावर फायदा होऊ शकतो, तसेच शिंदखेडा शहर व तालुक्यातील दोंडाईचा परिसर मिळून 50 खेडयांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे,
तसेच लघु पाटबंधारे योजने अंतर्गत बिलाडी या धरणाचे काम सुरु असून या धरणामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील खामगांव या गावाच्या चारही बाजुने पाण्याचा साठा हा मोठ्या प्रमाणात होणार असल्या कारणाने गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, तरी नंदुरबार तालुक्यातील अत्यंत महत्वाचा तापी बुराई उपसा सिंचन योजना पूर्णत्वासाठी कायम दुष्काळी परिस्थीती असलेल्या नंदुरबार तालुक्याला न्याय देण्यासाठी, तसेच लघु पाट बंधारे योजने अंतर्गत बिलाडी धरणाच्या बांधकामामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील खामगांव या गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात बैठक लावावी व बैठकीस आमंत्रीत करण्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



