*श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाट्य संघाची जिल्हास्तरावर बाजी, विभागीय स्तरासाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाट्य संघाची जिल्हास्तरावर बाजी, विभागीय स्तरासाठी निवड*
*श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाट्य संघाची जिल्हास्तरावर बाजी, विभागीय स्तरासाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2026 -27 अंतर्गत विज्ञान आणि समाज या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत हि.गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथील विज्ञान नाट्य संघाने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे संघाची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध प्रभावीपणे नाट्यरूपातून सादर केले. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, अभिनयकौशल्य आणि सांघिक प्रयत्न यांमुळे या सादरीकरणाला यश मिळाले. या यशासाठी समन्वयक सौ. सुषमा शाह, मुख्याध्यापक प्रशांत बागुल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील आणि पर्यवेक्षक सुनील शाह यांचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक शिक्षिका मनीषा कलाल, शिक्षक सुनील गिरासे आणि शिक्षिका वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सरावासाठी विशेष परिश्रम घेतले. नाट्यप्रयोगाच्या लेखन व दिग्दर्शनासाठी देविदास पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. नेहा पाटील यांनीही मदत केली. जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी करून विभागीय स्तरावर धडक मारणाऱ्या हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाट्य संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



