*मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची दुधाळे येथे भेट,सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी दिल्या सूचना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची दुधाळे येथे भेट,सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी दिल्या सूचना*
*मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची दुधाळे येथे भेट,सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी दिल्या सूचना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल नंदुरबार तालुक्यातील दुधाळे येथे भेट देऊन ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्राची पाहणी केली. राज्यभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गोयल यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आणि अंगणवाडी परिसरातील स्वच्छतेची पाहणी करून अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, अभियानातील उर्वरित उपक्रम निर्धारित वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.विद्यार्थ्यांना योग व आरोग्याचे महत्त्व पटवून दिले
जिल्हा परिषद शाळा, दुधाळे येथील विद्यार्थ्यांनी यावेळी योगध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर त्यांनी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन बालकांचे प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, खेळ आणि वैयक्तिक स्वच्छता यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत दुधाळे येथील अधिकारी व पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते.



