*समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे, सहसचिव ठाकूर यांना निवेदन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विषयांवर सविस्तर चर्चा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे, सहसचिव ठाकूर यांना निवेदन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विषयांवर सविस्तर चर्चा*
*समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे,सहसचिव ठाकूर यांना निवेदन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विषयांवर सविस्तर चर्चा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे सहसचिव ठाकूर यांना निवेदन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच कॅबिनेट ची मंजुरी घेऊन ग्रॅज्युटी देणे बाबत शासन विचाराधीन आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 ऐवजी 65 वर्ष करण्याबाबत शासन कार्यवाही करेल. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणे बाबत केंद्र सरकारकडे सुधारित प्रस्ताव पाठवून त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल सांगण्यात आले. 1 महिना उन्हाळी सुट्टी व आजारपणाची रजा देणे बाबत मंत्री विचाराधीन आहेत. मोबाईल रिचार्ज चे पैसे वाढवून देणे केंद्र शासनाला लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले या व इतर प्रश्नांवर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे चर्चा केली सदर शिष्ट मंडळात समन्वय समितीचे पदाधिकारी युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, अमोल बैसाणे उपस्थित होते.



