*नंदुरबार जिल्ह्यात 10 व 11 ऑक्टोबर रोजी नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, 18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हà¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात 10 व 11 ऑक्टोबर रोजी नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, 18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हà¤
*नंदुरबार जिल्ह्यात 10 व 11 ऑक्टोबर रोजी नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, 18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हा निवडणूक आंधकाऱ्याच आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्याचे सह सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक-ईएलआर 2026/प्र.क्र.-70/भाग 1/निवडणूक -6 दिनांक 30 सप्टेंबर 2026 पत्रान्वये, नंदुरबार जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी गतीमान करण्यासाठी विशेष 'स्वीप' (SVEEP) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांना, विशेषत नवमतदारांना नाव नोंदणीची संधी मिळावी याकरिता 10 व 11 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यात विशष नादणा शिवारांच (Special Camps) आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या सर्व विधानसभा मतदारसंघांमधील प्रत्येक मतदान केंद्रावर हे विशेष कॅम्प आयोजित केले जातील.
विशेष नोंदणी कॅम्पचे वेळापत्रक
शनिवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2026 व रविवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2026
(वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
कॅम्पमधील मुख्य सुविधा व मार्गदर्शनः प्रत्यक्ष मतदान केंद्र स्तरावर नोंदणीः या विशेष शिबीरांच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर बी.एल.ओ. (BLO - Booth Level Officer) हे सर्व आवश्यक अर्जासह (फॉर्म 6, 7 आणि 8) उपस्थित असणार आहेत. नवीन मतदार नोंदणी (फॉर्म 6): दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले सर्व युवक-युवती नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म नं. 6 भरून देऊ शकतात. दरुस्ती व गन्ना बदन्न (फॉर्म 9): मतदार यादीतील नावातील दुरुस्ती. फोटो बदलणे किंवा पत्ता बदलण्यासाठी फॉर्म नं. 8 भरता येईल. 4. ऑनलाईन अर्ज सुविधाः नागरिकांना Voter Helpline App किंवा voters.eci.gov.in या पोर्टलद्वारे स्वतःच्या मोबाईलवरूनही
ऑनलाईन अर्ज करता येईल. मतदान केंद्रावर उपस्थित बी. एल.ओ. नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करतील. जिल्हा प्रशासनाचे आवाहनः "जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, हा प्रशासनाचा उद्देश आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयां मधील 18 ते 19 वयोगटातील तरुण-तरुणींनी आणि आजवर नाव नोंदणी न केलेल्या नागरिकांनी या विशेष कॅम्पचा लाभ घेऊन आपली मतदार नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



