*अली-अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मसी सप्ताह उत्साहात संपन्न, विविध शैक्षणिक,संशोधन,सामाजिक,क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांना विद्यार्थ्यांचा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अली-अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मसी सप्ताह उत्साहात संपन्न, विविध शैक्षणिक,संशोधन,सामाजिक,क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांना विद्यार्थ्यांचा
*अली-अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मसी सप्ताह उत्साहात संपन्न, विविध शैक्षणिक,संशोधन,सामाजिक,क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम संचलित अली-अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी,अक्कलकुवा यांच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मसी सप्ताहाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते, “Empowering the Pharmacist” या संकल्पनेवर आधारित या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सर्जनशील, संशोधनपर, सामाजिक, क्रीडा, करिअर मार्गदर्शन व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
फार्मसी सप्ताहाची सुरुवात चित्रकला व रांगोळी स्पर्धेने करण्यात आली, विद्यार्थ्यांनी आकर्षक व संदेशपर रांगोळ्या तसेच चित्रे साकारली. या उपक्रमाचे मार्गदर्शन प्रा. काझी कामिल यांनी केले. त्यानंतर पथनाट्य (Skit) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सहाय्यक प्राध्यापक उबैदुर रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दोन पथनाट्ये सादर केली. फार्मासिस्टची भूमिका, आरोग्यसेवा आणि सामाजिक जबाबदारी याबाबत प्रभावी संदेश या माध्यमातून देण्यात आला.
वादविवाद स्पर्धेचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक दानिश मुगनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या स्पर्धेत तीन विविध संघांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्र, आरोग्यसेवा आणि फार्मासिस्टच्या भूमिका व जबाबदाऱ्या यांसंदर्भात विविध विषयांवर आपले विचार मांडले.
ऑनलाइन प्रश्नमंजुषेत 119 सहभागी झाले होते, “Empowering the Pharmacist” या संकल्पनेवर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा डॉ. माजाज काझी आणि प्रा. शाहरुख मक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल 119 सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत फार्मसी व आरोग्यविषयक ज्ञानाचे प्रदर्शन केले. करिअर मार्गदर्शन व उद्योजकता सेमिनार, विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी तसेच उद्योजकतेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी Institute Innovation Cell च्या अधिपत्याखाली विशेष करिअर मार्गदर्शन व उद्योजकता सेमिनार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. एजाज अहमद यांनी केले.
हैदराबाद येथील उद्योजक व Pharma Biz चे संस्थापक अब्दुल अजीम यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी, उद्योजकता, व्यवसायाच्या शक्यता आणि स्वतःचा उपक्रम सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन संशोधन पोस्टर स्पर्धा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नाविन्यपूर्ण विचार आणि Innovation, विकसित करण्यासाठी Innovation Challenge, अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन संशोधन पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रासह देशातील विविध फार्मसी महाविद्यालयांमधून सहभाग नोंदविण्यात आला आणि एकूण 12 नाविन्यपूर्ण पोस्टर्स प्राप्त झाले. या स्पर्धेचे आयोजन डॉ. माजाज काझी आणि प्रा. शाहरुख मक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उत्कृष्ट तीन पोस्टर्सची निवड करून विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. अध्यक्ष मौलाना हुजेफा वसतनवी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक एच. आर. पटेल कॉलेज, शिरपूर येथील सहभागीने मिळविला.
समाजसेवा व सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रा. अबुजर आणि प्रा. मिन्हाज यांच्या मार्गदर्शनाखाली, Red Ribbon Club आणि Blood Bank, Nandurbar यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या रक्तदान मोहिमेत महाविद्यालयातील 65 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले, तर एकूण 70 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समुदायाशी संवाद आणि आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे मार्गदर्शन सहाय्यक प्राध्यापक दानिश मुगनी यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या विविध गटांनी अक्कलकुवा शहरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन नवीन विद्यार्थ्यांना तसेच समुदायातील विविध घटकांना फार्मासिस्टची भूमिका, फार्मसी व्यवसायाचे महत्त्व आणि आरोग्यसेवेतील फार्मासिस्टचे योगदान याबाबत माहिती दिली.
अॅग्रो इंडस्ट्री भेटीतून प्रत्यक्ष अनुभव,
विद्यार्थ्यांना उद्योगाची प्रत्यक्ष ओळख व्हावी यासाठी अॅग्रो इंडस्ट्रीला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीत 23 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी अॅग्रो इंडस्ट्रीची कार्यपद्धती तसेच मधमाशी पालन (Honey Bee Keeping) प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेतली.
या उपक्रमाचे मार्गदर्शन Professor Dr. Jamil Abbas आणि Dr. Zarina यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे समन्वयन क्रीडा प्रभारी प्रा. वसीम अन्सारी यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. फार्मसी सप्ताहादरम्यान आयोजित विविध उपक्रमांचे जामिया इस्लामिया इशाअतुल उलूमचे अध्यक्ष मौलाना हुजेफा वसतनवी तसेच उपाध्यक्ष मौलाना ओवैस वसतनवी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि महाविद्यालयाने राबविलेल्या शैक्षणिक, सामाजिक, संशोधनपर व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुलाम जावेद खान यांनी फार्मसी सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले तसेच भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
विविध स्पर्धा, ऑनलाइन क्विझ, राष्ट्रीय संशोधन पोस्टर स्पर्धा, करिअर मार्गदर्शन, उद्योजकता, रक्तदान, जनजागृती रॅली, अॅग्रो इंडस्ट्री भेट आणि क्रीडा उपक्रमांमुळे** अली-अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीचा आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित फार्मसी सप्ताह विद्यार्थ्यांसाठी तसेच अक्कलकुवा परिसरासाठी एक संस्मरणीय आणि समाजोपयोगी उपक्रम ठरला. या सर्व उपक्रमांमधून “Empowering the Pharmacist” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि उद्योजकतेची भावना विकसित करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.



