*नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ पंचनामे सुरू, शेतकऱ्यांना अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ पंचनामे सुरू, शेतकऱ्यांना अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन*
*नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ पंचनामे सुरू,शेतकऱ्यांना अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-खरीप हंगाम 2026-27 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये क्षेत्रीय पातळीवर महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागामार्फत पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.पंचनाम्याबाबत शेतकरी बांधवांना काही अडचण अथवा समस्या असल्यास त्यांनी संबंधित कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सन 2026- 27 च्या खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यात दुष्काळ घोषित करून शेतकरी बांधवांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दुष्काळ व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार क्षेत्रीय पातळीवर पंचमाने सुरु आहेत. पंचनाम्याबाबत शेतकरी बांधवांना काही अडचण अथवा समस्या असल्यास त्यांनी संबंधित कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. कृषी विभागाचे संपर्क क्रमांक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार : ९१८५२३९००५
• उपविभागीय कृषी अधिकारी, नंदुरबार : ९१८५२३९००३
• उपविभागीय कृषी अधिकारी, शहादा : ९४२०७०७६०३
• तालुका कृषी अधिकारी, नंदुरबार : ९१८५२३९०१६
• तालुका कृषी अधिकारी, नवापूर : ९०८५२३९०७३
• तालुका कृषी अधिकारी, अक्कलकुवा : ९१८५२३९१३६
• तालुका कृषी अधिकारी, शहादा : ९१८५२३९३०७
• तालुका कृषी अधिकारी, तळोदा : ९१८५२३९१८३
• तालुका कृषी अधिकारी, अक्राणी : ९४२०७०७६०३



