*जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी आज आर्चरी खेळाडूंची निवड चाचणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी आज आर्चरी खेळाडूंची निवड चाचणी*
*जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी आज आर्चरी खेळाडूंची निवड चाचणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी ‘मिशन लक्षवेध’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शूटिंग (नेमबाजी), रोईंग, सेलींग, टेबल टेनिस, लॉन टेनिस या 12 क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी आर्चरी (तिरंदाजी) या क्रीडा प्रकाराची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार आर्चरी जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र,जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पात्रता धारक खेळाडूंनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे – निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. हे प्रशिक्षण केंद्र अनिवासी स्वरूपाची असेल. ही केंद्रे प्राधान्याने जिल्हा, विभागीय क्रीडा संकुल परिसरात स्थापित करण्यात येणार आहे. ज्या क्रीडा प्रकाराच्या सुविधा जिल्हा, विभागीय संकुल येथे उपलब्ध नसल्यास असे केंद्रे इतरत्र शासकीय किंवा निमशासकीय संकुलामध्ये उभारण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदर केंद्रे खाजगी संस्थांच्या जागा, संकुलांमध्ये उभारण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक तो करारनामा संबंधित संस्थेबरोबर करण्यात येणार आहे. आर्चरी खेळाडू निवडीचे निकष संबंधित वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी 21 वर्षांपर्यंतचे मुले व मुली पात्र राहतील. खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. खेळाडूने किमान राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतलेला किंवा पदक प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. गत दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल. तसेच क्रीडा कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती (Fitness) चाचणीत पात्र होणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून देण्यात आलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे, जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, गत दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 3 छायाचित्रे, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र तसेच आवश्यक इतर कागदपत्रे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गुणवंत खेळाडूंनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार यांच्याशी 9850559509 या क्रमांकावर संपर्क साधावा. वरील निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक खेळाडूंनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे- निंबाळकर यांनी केले आहे.



