*राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत ढोंगसागाळी एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत ढोंगसागाळी एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग*
*राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत ढोंगसागाळी एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या वतीने आयोजित 23 वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा-2026 मध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, ढोंगसागाळी येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत उत्साहपूर्ण व उल्लेखनीय सहभाग नोंदविला. अशी माहिती शाळेचे प्राचार्य अनिल मंगले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अतिदुर्गम आदिवासी भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळणे ही शाळेसह परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. नियमित सराव, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखविली. या स्पर्धेत शाळेतील साहिल गोकुळ सूर्यवंशी, तेज रीमान पावरा, धनंजय राजेंद्र पटले, धनराज वसंत कोकणे आणि ऋषभ सामवेल वळवी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य अनिल मंगळे यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील क्रीडा गुणांना योग्य संधी व व्यासपीठ मिळावे, यासाठी शाळेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तसेच क्रीडा शिक्षक आशिष शर्मा आणि धनुर्विद्या प्रशिक्षक राजेश्वर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण, नियमित सराव व मार्गदर्शन दिले. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, ढोंगसागाळीच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली क्षमता विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यस्तरीय स्पर्धांमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन भविष्यात उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य, क्रीडा शिक्षक व धनुर्विद्या प्रशिक्षक यांचे शाळेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.



