*जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी हायस्कूलच्या प्रेरणा आणि गार्गी मोंडे या दोन्ही भगिनी अव्वल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी हायस्कूलच्या प्रेरणा आणि गार्गी मोंडे या दोन्ही भगिनी अव्वल*
*जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी हायस्कूलच्या प्रेरणा आणि गार्गी मोंडे या दोन्ही भगिनी अव्वल*
ओणी(प्रतिनिधी):-जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा रत्नागिरी आणि रत्नागिरी जलतरण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडल संचालित नूतन विद्या मंदिर ओणीच्या इयत्ता 10 वी वर्गातील प्रेरणा एकनाथ मोंडे हिने 100 मिटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक, 50 मिटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक, 50 मिटर फ्री स्टाईल प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच गार्गी एकनाथ मोंडे इयत्ता 8 वी हिने 100 मिटर ब्रेस्ट स्ट्रोक, 50 मिटर ब्रेस्ट स्ट्रोक यामध्ये प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी शाळेच्या दोघी मुली अव्वल ठरल्या आहेत. दोघीं बहिणींचे शाळा आणि ओणीतील सर्व लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. यासाठी कोच विवेक विलेणकर यांनी मार्गदर्शन केले.



