*वाटूळमधील श्री गांगो आकारी मंदिराचा परिसर दिवाबत्तीनी उजळला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाटूळमधील श्री गांगो आकारी मंदिराचा परिसर दिवाबत्तीनी उजळला*
*वाटूळमधील श्री गांगो आकारी मंदिराचा परिसर दिवाबत्तीनी उजळला*
वाटूळ(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ गावातील जागृत देवस्थान श्री गांगो आकारी मंदिरात देणगीदारांनी दिलेल्या निधीतून दिवाबत्तीची सोय करण्यात आल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. या मंदिरात स्ट्रीट लाईट लावण्यासाठी ग्रामस्थ कैं तातोबा वासुदेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ गं.भा. सुहासिनी वासुदेव चव्हाण यांनी 10,000 रु तसेच कै. दामोदर नाईक यांच्या स्मरणार्थ श्रीमती वंदना नाईक यांनी 8000 रु एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण मंदिरात पाच स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्याने मंदिर आणि बाहेरील परिसर उजळून निघाला आहे मंदिर परिसरात दिवाबत्तीची निकड लक्षात घेऊन निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थ तसेच भक्तांनी देणगीदारांचे आभार मानले आहेत.



