*घनकचरा अधिनियमच्या अंमल बजावणीसाठी महिला बचत गटांना मार्गदर्शन,नंदुरबार तालुक्यातील 32 गावातील महिला बचत गटांना मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घनकचरा अधिनियमच्या अंमल बजावणीसाठी महिला बचत गटांना मार्गदर्शन,नंदुरबार तालुक्यातील 32 गावातील महिला बचत गटांना मार्गदर्शन*
*घनकचरा अधिनियमच्या अंमल बजावणीसाठी महिला बचत गटांना मार्गदर्शन,नंदुरबार तालुक्यातील 32 गावातील महिला बचत गटांना मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियान व स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर घनकचरा अधिनियम 2026 ची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी यासाठी नंदुरबार तालुक्यातील
कोळदा, पातोंडे व खोंडामळी गटातील 32 ग्रामपंचायतींच्या महिला बचत गटांच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व सी.आर.पी. यांची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक गणेश मोरे व नंदुरबार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ अर्चना वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यात सेवा संकल्प अभियान, स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन कक्ष व उमेद कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोळदा येथे घनकचरा अधिनियम 2026 बाबत महिला बचत गटांना मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून कोळदा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मोहिनी वळवी या उपस्थित होत्या. कार्यशाळेचे उद्घाटन सरपंच सौ मोहिनी वळवी व पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेत सहायक गट विकास अधिकारी संजय पाटील यांनी उपस्थित बचत गटाच्या महिलांना ग्रामस्वच्छता, कचरा वर्गीकरण व योग्य कचरा व्यवस्थापनामध्ये महिलांनी महिलांची भूमिका व सहभाग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कचरा वर्गीकरणात बचत गटांची भूमिका गाव स्तरावरील इतर महिलांमध्ये जनजागृती करून गावातील स्वच्छता राखण्यासाठी कशी उपयोगी पडेल याबाबत मार्गदर्शन करून बचत गटांनी गाव स्तरावर समन्वयकाची भूमिका बजवावी असे आवाहनही संजय पाटील यांनी यावेळी केले. जिल्हा परिषद नंदुरबार येथील स्वच्छ भारत मिशन कक्षाचे घनकचरा व्यवस्थापन तज्ञ तुषार देवरे यांनी दिनांक एक एप्रिल 2026 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरात लागू करण्यात आलेला घनकचरा अधिनियम 2026 बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नवीन अधिनियमानुसार घरगुती कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छतागृहातील कचरा आणि विशेष काळजीची आवश्यकता असलेला विशेष कचरा अशा चार प्रकाराचे वर्गीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने संकलन व व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अजय जाधव यांनी महिला बचत गटांच्या आर्थिक प्रगतीसाठी कचरा वर्गीकरण व पुनर्वापर यातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, बचत गटांचे उत्पन्न वाढवावे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत स्वच्छ भारत मिशन कक्षातील समूह समन्वयक यशवंत गांगुर्ड यांनी उपस्थित महिला बचत गटांच्या महिलांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी हेमंत जोशी, किशोर खरकार, कपिल पवार, यशवंत गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेस कोळदा, खोंडामळी व पातोंडा गटातील 32 गावातील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.



