*माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय किशोरवयीन मुला मुलींची सक्षमीकरण कार्यशाळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय किशोरवयीन मुला मुलींची सक्षमीकरण कार्यशाळा*
*माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय किशोरवयीन मुला मुलींची सक्षमीकरण कार्यशाळा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील ब्रि. अंकुशविहिर येथिल अश्वत्था माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय किशोरवयीन मुला मुलींची सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली यावेळी इ.8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा व ग्रामीण रुग्णालया मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम किशोर, सक्षम व्यक्तीमत्व, सक्षम भविष्य यासाठी मुला- मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रिटिश अंकुशविहीर येथील पिअर एज्युकेटर, किशोरवयीन मुला - मुलींची सक्षमीकरण कार्यशाळेचा मुख्य उद्देश किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, योग्य माहिती व सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम करणे हा होता. कार्यशाळे दरम्यान किशोरवयीन मुला -मुलींचे पोषण, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक आरोग्य, भावनिक बदल, लैंगिक व प्रजनन आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, हिंसा व दुखापत प्रतिबंध तसेच आरोग्यदायी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल समजून घेणे, गैरसमज दूर करणे आणि गरज भासल्यास योग्य वेळी आरोग्यसेवा घेणे याबाबतही माहिती देण्यात आली. आपल्या गटातील किशोरवयीन मुला-मुलींशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे, आरोग्य विषयक अचूक माहिती पोहोचवणे, आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आवश्यकतेनुसार त्यांना योग्य आरोग्यसेवेकडे मार्गदर्शन करणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रश्न विचारले व आरोग्यविषयक विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मधुकर वसावे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,अशा उपक्रमांमुळे किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता, आरोग्य जागरूकता आणि सकारात्मक जीवनशैली विकसित होण्यास मदत होते. तसेच किशोरवयीन मुल-मुलींना आत्मविश्वास व ओळख वाढवणे, प्रभावी संवाद व ऐकण्याचे कौशल्य विकसित करणे, भावना ओळखणे व योग्य पद्धतीने व्यक्त करणे, आरोग्य आणि स्वच्छता विषयी जागरूक करणे, शैक्षणिक व भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून ध्येय निश्चित करण्यास प्रोत्साहन देणे, बालविवाह प्रतिबंध कायदा व जागरूक करणे, किशोरवयीन मुला -मुलींनसाठी आधार स्तंभ मैत्री केंद्र बाबत आत्मविश्वास वाढवणे आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक पाटील यांनी विकली आयर्न फॉलिक ऍसिड पुरवणी योजना, जंतनाशक विषयी माहिती देण्यात आली.तसेच ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवाचे मैत्री केंद्राच्या समुपदेशक शकुंतला वसावे यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छता तसेच उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथील समुपदेशक आनंद नाईक
यांनी सिकलसेल आजराविषयी माहिती दिली. ग्रामीण रुग्णालय मोलगी येथील समुपदेशक मधुकर वसावे यांनी व्यसनाधिनता, आहार, ताणतणाव, मानसिक आरोग्य याविषयी माहिती दिली. कार्यशाळेत मुख्याध्यापक डॉ. जे.के. वळवी, पर्यवेक्षक व्ही.के. पाटील वरिष्ठ शिक्षक पी.एच. चव्हाण, डि.आर. काकुळते, किसन पाडवी, महेंद्र मराठे, अनिल नवले, यू.आर. सोनवणे आदी उपस्थित होते.



