*नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान, हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!, देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्व
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान, हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!, देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्व
*नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान, हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!, देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या-हिंदु जनजागृती समितीचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत अनेक शहरांमध्ये हिंदु युवती आणि महिलांसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येत असून महिला सुरक्षेविषयी जनजागृती करणारे विविध व्हिडिओ, तसेच प्रेरणादायी शौर्य गीत प्रसारित करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देतांना रमेश शिंदे पुढे म्हणाले की, आज युवतींना छेडछाड, पाठलाग, ऑनलाईन त्रास, लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, तसेच हिंसक हल्ले यांसारख्या विविध धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही परधर्मीय लोक खोटे नाव आणि खोटी ओळख सांगून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून त्यांचे शारिरीक शोषण करतात. पुढे या लव्ह जिहादच्या घटनांमध्ये ब्लॅकमेलिंग किंवा धर्मांतरासाठी दबाव आणला जातो. याबाबत युवतींमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भीती नव्हे, तर जागरूकता, आत्मविश्वास आणि स्वरक्षणाचे कौशल्य निर्माण करण्यासाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान राबवण्यात येणार आहे. या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांमध्ये शारीरिक प्रतिकाराचे तंत्र शिकवण्याबरोबरच संकटाची चाहूल ओळखणे, योग्य वेळी निर्णय घेणे, तसेच मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खंबीर रहाण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण वर्गांमध्ये 15 वर्षांवरील युवतींसाठी प्रवेश दिला जाणार आहे. हिंदु जनजागृती समितीने अधिकाधिक हिंदु युवतींनी या अभियानात सहभागी होऊन विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी आपल्या शहरातील ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानात सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला क्यू-आर कोड (QR Code) स्कॅन करून अथवा खालील लिंक वर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पहा -www.hindujagruti.org/hindi/navratri-festival



