*एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांची, राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांची, राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
*एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांची, राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या वतीने आयोजित 23 वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. अशी माहिती शाळेचे प्राचार्य अनिल मंगले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय क्रीडा व्यासपीठावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणे ही जिल्ह्यासाठी महत्त्वाची बाब असून मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत क्रीडा क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्पर्धेत महेश सायसिंग पाडवी, दिव्यशील शशांक गावित, अंकित गिरीश पाडवी, आकाश संदीप वळवी आणि आदित्य देवीलाल पवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना शाळेचे प्राचार्य अनिल मंगले यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
तसेच क्रीडा शिक्षक सौरभ पांडे आणि धनुर्विद्या प्रशिक्षक (NIS) राजेश्वर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
धनुर्विद्येसारख्या खेळातून विद्यार्थ्यांना जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळत असून, भविष्यात हे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नंदुरबार जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल परिवाराचे अभिनंदन करण्यात आले.



