*भारतीय कला-संस्कृतीच्या सुरेल विश्वात, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय कला-संस्कृतीच्या सुरेल विश्वात, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*भारतीय कला-संस्कृतीच्या सुरेल विश्वात, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय संगीत, कला, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावा, तसेच त्यांच्या कलात्मक व सर्जनशील जाणिवांना चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित SPIC MACAY Autumn Convention 2026 मध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, कान्ह ललित कला केंद्र, जळगाव येथे 1 ते 4 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयोजित या अधिवेशनात इयत्ता नववीतील तीन व इयत्ता आठवीतील दोन, अशा एकूण पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या अधिवेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत, विविध कलाप्रकार, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि भारतीय परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला अनुभवाची जोड मिळून त्यांच्या कलात्मक, सर्जनशील व सांस्कृतिक जाणिवांना प्रोत्साहन मिळाले.
अधिवेशनात प्रांजल गावित, वर्षा गावित व साहिल कोकणी (इयत्ता 9वी) तसेच तनुजा वळवी व शशिकांत चौरे (इयत्ता 8वी) यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रमोद गोसावी, TGT (Hindi) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. SPIC MACAY Autumn Convention 2026 मधील विद्यार्थ्यांचा सहभाग हा त्याचाच महत्त्वपूर्ण भाग असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय कला व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख होऊन त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत आहे, असे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारचे प्राचार्य अनिल मंगले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



