*शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस सुट्टी उपभोगूनही,सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत अनुपस्थित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस सुट्टी उपभोगूनही,सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत अनुपस्थित*
*शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस सुट्टी उपभोगूनही,सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत अनुपस्थित*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस सुट्टी उपभोगूनही सोमवारी 5 ऑक्टोबर 2026 रोजी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजेरी लावू शकले नसल्याने तालुक्यातील दुर्गम भागातून आपले कामे घेऊन आलेल्या नागरिकांना संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागल्याचे लाजिरवाणे चित्र दिसून आले.
अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना 2 ऑक्टोबर 2026 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त सुट्टी होती जोडूनच शनिवार रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी उपभोगली असताना सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याने दुर्गम भागातून सकाळी आपले काम आटोपून परत घरी पोहोचण्यासाठी आलेल्या नागरिकांना अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा करावी लागल्याचे लाजिरवाणी चित्र अनेक शासकीय कार्यालयांमध्ये दिसून आले अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत हजर नसल्याचे आढळून आले तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनाची सकाळी साडेदहा वाजता चक्क एक महिला कर्मचारी साफसफाई करत असल्याचे आश्चर्यकारक चित्र दिसून आले तर उर्वरित निवासी नायब तहसीलदार नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षण अधिकारी तसेच विविध शाखांतील कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असल्याचे चित्र आढळले. पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्या दालनाला तसेच बांधकाम उपअभियंता कार्यालयास सकाळी साडेदहा वाजेपर्यंत कुलूप लावल्याचे आढळले तर सहाय्यक गट विकास अधिकारी ग्राम विस्तार अधिकारी लघु सिंचन उप अभियंता वित्त विभाग कृषी विभागांमध्ये एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याचे गंभीर चित्र दिसून आले सामान्य प्रशासन विभागाचे एक अधिकारी उपस्थित आढळून आले शिक्षण विभागात एक कर्मचारी उपस्थित होते बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे कल कुवा मोलगी व पिंपळखुंटा तीनही बालविकास प्रकल्प अधिकारी तळोदा येथे बैठकीस गेल्याचे सांगण्यात आले, तालुका आरोग्य अधिकारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयात देखील तीच स्थिती आढळून आली, एकंदरीत तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित झाले नसल्याची बाब प्रकर्षाने दिसून आल्याने, आपापल्या कामांसाठी आलेल्या नागरिकांनी हे चित्र नेहमीचेच असल्याचे आपल्या भाषेत सांगितले. शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजा साठीच्या पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला असून शनिवार, रविवार दोन दिवस कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पाच दिवसांच्या आठवड्यात शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ वाढवून देण्यात आली असताना या पाच दिवसांच्या आठवड्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेप्रमाणे कर्तव्य बजावतात का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आपल्या शासकीय अथवा खाजगी चार चाकी वाहनातून नंदुरबार येथून ये जा करतात अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचारी अकरा वाजेपर्यंत हजेरी लावतात सोबत आपल्या वाहनांमध्ये सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही नंदुरबारहुन आणतात व घेऊन जात असल्याचे दिसून येते या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यालय तालुक्याचे ठिकाण आहे की नंदुरबार जिल्हा मुख्यालयाचे असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे एकंदरीत पाच दिवसांच्या आठवड्याची स्पष्ट सूचना असलेल्या कर्मचाऱ्यांना आठवडाभर कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर हजर राहण्याची किती जाणीव आहे हे यावरून स्पष्ट होत असून याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे. दिनांक पाच ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी महसूल विभागाकडे महसुली गावाचा दाखला घेण्यासाठी अनेक दिवसांपासून चकरा मारणाऱ्या हिरालाल पाडवी रा. मिठ्याफळी यांना सकाळी साडेदहा वाजेला संबंधित कर्मचारी हजर नसल्याचे समजल्याने त्यांनी या कार्यालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.



