ताजा खबरे:
*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*
*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*

  • Share:

*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथील महिला रुग्णालयातील जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र (DEIC) येथे 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी टू-डी इको, हृदय तपासणी व निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. कीम्स हॉस्पिटल, ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात 150 बालकांची हृदय तपासणी करण्यात आली. यापैकी हृदयाशी संबंधित समस्या आढळलेल्या 25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी RBSK जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर ढिवरे, कार्यक्रम सहाय्यक करण वसावे, DEIC व्यवस्थापक प्रितेश खैरनार, कीम्स हॉस्पिटलच्या बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोनिया श्रीनिवास, डॉ. उल्हास पाटील, नितीन कोळी तसेच RBSK, DEIC व आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. तपासणीत निदान झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत आवश्यक शस्त्रक्रिया व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील उपचारांसाठी बालकांना मुंबई येथे पाठविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर ढिवरे यांनी दिली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांमधील जन्मजात तसेच इतर हृदयविकारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळावेत, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. पालकांनी 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची वेळेवर आरोग्य तपासणी करून शासनाच्या मोफत उपचार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी RBSK पथक, DEIC विभाग, महिला रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबविण्यात आले.
बालकांच्या आरोग्याची वेळेवर तपासणी करून गंभीर आजारांचे लवकर निदान आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले असून, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून “निरोगी बालक, सुदृढ समाज” या उद्दिष्टाच्या दिशेने जिल्हा आरोग्य यंत्रणेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी RBSK पथक वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मोरे, डॉ. सुजाता दहिवेलकर, डॉ. हिरकणी महाले, डॉ.अविनाश चकोर, डॉ. सोनाली कुलकर्णी, डॉ. मोनिका वसावे, डॉ. सुशील कुमार मराठे, डॉ.सय्यद अरसलान, डॉ.विनोद बाविसकर, डॉ.शशिकांत पाटील, डॉ.राकेश पाटील, डॉ.जितेंद्र भंडारी,  DEIC विभाग, डॉ.कपिल दुसेजा, महेश नगराळे, प्रितेश खैरनार, भैय्यासाहेब अहिरे, डॉ. एंजल वसावे, बागेश्री पगारे, सुषमा बिरारे, महिला रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विनय सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून  "आरोग्यदायी बालपण - निरोगी भविष्य" या संकल्पनेला बळकटी देणारा ठरला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
October, 06 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
October, 06 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*
October, 06 2026
*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
October, 06 2026
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
October, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज