*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्राथमिक आरोग्य केंद्र, सुलवाडा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सेवा संकल्प अभियानासह विविध आरोग्य अभियानांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.बैठकीत सेवा संकल्प अभियान, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ आणि ‘तिशीचा पल्ला अन् आरोग्य सल्ला’ या अभियानांतर्गत सुरू असलेल्या आरोग्य सेवांचा उपकेंद्रनिहाय व गावनिहाय आढावा घेण्यात आला. गावनिहाय पथकांकडून करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व स्क्रिनिंग, उपचाराखालील रुग्णांची संख्या, उपचाराची सद्यस्थिती तसेच विविध आरोग्य सेवांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील कृतीदल समितीची बैठक घेण्यात आली. तसेच HMIS गुणवत्ता पडताळणी करून उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील HMIS माहितीचे प्रमाणीकरण करण्यात आले.
आरोग्य सेवांमधील उपलब्धी, त्रुटी व आवश्यक सुधारणांबाबत संबंधित समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), एएनएम व एमपीडब्ल्यू यांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर यावेळी भर देण्यात आला.



