*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पी.एम.श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता नववी व अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. इयत्ता नववीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर किंवा नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता आठवीत शिकत असणे आवश्यक आहे. इयत्ता अकरावीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी विद्यार्थी याच तालुक्यांतील शासनमान्य शाळेत इयत्ता दहावीत शिकत असावा. इयत्ता नववीसाठी उमेदवाराचा जन्म 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 या कालावधीत झालेला असावा. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी उमेदवाराचा जन्म 1 जून 2010 ते 31 जुलै 2012 या कालावधीत झालेला असणे आवश्यक आहे. ही वयोमर्यादा सर्व उमेदवारांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही लागू आहे.
इयत्ता नववीच्या निवड चाचणीसाठी विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता आठवीची परीक्षा, तर इयत्ता अकरावीच्या निवड चाचणीसाठी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व मुली, दिव्यांग तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार जागा राखीव आहेत. तृतीयपंथी उमेदवारांनाही निवड चाचणीसाठी अर्ज करता येणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2026 साठीचे अर्ज https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 तसेच नववी साठी
https://cbseitms.nic.in/2026/nvsix 9 व इयत्ता अकरावी साठी https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9 या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. अर्जासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचा फोटो, विद्यार्थ्यांची सही, पालकांची सही आवश्यक आहे. परीक्षा शनिवार 10 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता असेल. असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, यांनी कळविले आहे.



