*नंदुरबार येथे 'राणी दुर्गावती जयंती' व 'सेवा संकल्प अभियान अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे 'राणी दुर्गावती जयंती' व 'सेवा संकल्प अभियान अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*
*नंदुरबार येथे 'राणी दुर्गावती जयंती' व 'सेवा संकल्प अभियान अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासकीय मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शिक्षक कॉलनी (पटेलवाडी) नंदुरबार वसतिगृह येथील विद्यार्थ्यांच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' तसेच 'राणी दुर्गावती जयंती निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 5 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती आणि MPSC परीक्षा याबाबत योग्य मार्गदर्शन करणे हा होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (नंदुरबार) चे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक व वक्ते म्हणून भामरे अकॅडमी (नंदुरबार) चे संचालक युवराज भामरे उपस्थित होते. मुख्य वक्ते युवराज भामरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, योग्य निवड, अचूक नियोजन आणि सखोल अभ्यासाबाबत अत्यंत मोलाचे व सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यसनमुक्ती, अभ्यासाचे नियोजन तसेच आदिवासी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधांचा योग्य उपयोग कसा करावा, याबाबत प्रवृत्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहपाल हेमंत तांबोळी यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात राणी दुर्गावती यांचे
जीवन कार्य, त्यांचा संघर्ष आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापुजनाने झाली. यानंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला, चंद्रकांत पवार यांचा सत्कार स्वप्नील गावित आणि दिनेश गावित या विद्यार्थ्यांनी केला.
मुख्य मार्गदर्शक युवराज भामरे यांचा सत्कार कल्पेश वळवी आणि दीपक पावरा यांनी केला.
किरण मोरे यांचा सत्कार अनेश वसावे आणि सचिन पावरा यांनी केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आकाश पाडवी याने केले, तर कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन किरण मोरे यांनी केले. या प्रसंगी परिसरातील सर्व वसतिगृहातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गृहपाल हेमंत तांबोळी, सुनिल पाडवी, राजेंद्र पाडवी, रवींद्र कोकाटे, प्रशांत नेहते, अंकुश जाधव, स्वप्नील शेवाळकर आणि इतर सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.



