*सातपुड्यात वनसंपत्तीची खुलेआम कत्तल; मोळ्यांची हॉटेलमध्ये इंधनासाठी विक्री,पहाटेच दुचाकींवरून मोलगी,अक्कलकुवा,खापरमध्ये लाकडांची वाहतूक,वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सातपुड्यात वनसंपत्तीची खुलेआम कत्तल; मोळ्यांची हॉटेलमध्ये इंधनासाठी विक्री,पहाटेच दुचाकींवरून मोलगी,अक्कलकुवा,खापरमध्ये लाकडांची वाहतूक,वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
*सातपुड्यात वनसंपत्तीची खुलेआम कत्तल; मोळ्यांची हॉटेलमध्ये इंधनासाठी विक्री,पहाटेच दुचाकींवरून मोलगी,अक्कलकुवा,खापरमध्ये लाकडांची वाहतूक,वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागातील वनक्षेत्रातून झाडांची कत्तल करून लाकडांची मोळी तयार केली जात असल्याची बाब समोर येत आहे. या मोळ्या पहाटेच्या सुमारास दुचाकींवरून मोलगी, अक्कलकुवा आणि खापर येथील बाजारपेठांमध्ये आणल्या जातात. त्यानंतर स्थानिक हॉटेलचालकांना या लाकडांची विक्री केली जाते. हॉटेलमधील स्वयंपाकासाठी इंधन म्हणून या लाकडांचा वापर होत असल्याने वनसंपत्तीच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक भाषेत या लाकडांच्या गठ्ठ्यांना मोळी असे म्हटले जाते.मोळीच्या आकारानुसार त्याची किंमत ठरवली जाते. डोंगराळ भागातून लाकूड गोळा करणे, त्याच्या मोळ्या तयार करणे आणि पहाटेच्या वेळी दुचाकीवरून शहर व प्रमुख बाजारपेठांमध्ये पोहोचवणे, अशा पद्धतीने हा व्यवहार सुरू असल्याचे सांगितले जाते. या लाकडांची नियमित विक्री होत असल्यास वनक्षेत्रातील वृक्षतोडीचे प्रमाण आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांची तपासणी होणे आवश्यक आहे. दरम्यान वनक्षेत्रातून होणारी वृक्षतोड आणि लाकडांची वाहतूक रोखण्याची जबाबदारी वनविभागाची असताना या प्रकारावर प्रभावी कारवाई होत नसल्याची स्थानिक पातळीवर चर्चा आहे. पहाटेच्या वेळी होणारी वाहतूक, लाकडांची विक्री आणि हॉटेलमध्ये होणारा वापर याबाबत वनविभागाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वनसंपत्तीचे नुकसान रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेने या प्रकरणाची दखल घेऊन नियमांचे उल्लंघन होत असल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करणे आवश्यक आहे.