*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा वार्षिक योजना सन 2023 -24 अंतर्गत नागरी सुविधा विशेष अनुदानातून लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली ओझोन घंटागाडी गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात धूळ खात उभी असल्याने केळवली ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे घंटागाडी वापराविना पडून असताना ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून कचरा अद्यापही रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
केळवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वच्छतेसाठी घंटागाडीचा वापर अपेक्षित असताना संबंधित वाहनाचा गेल्या तीन वर्षांत प्रभावी वापर झालेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनाचा उपयोग नेमका कशासाठी झाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत परिसरातील काही कोंबडी व्यावसायिकांकडून व्यवसायातून निर्माण होणारी घाण परिसरातील ओढ्यांमध्ये टाकली जात असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ओढ्यांमध्ये कचरा व घाण साचल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. ही कुत्री रस्त्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छता राखण्यासाठी उपलब्ध असलेली घंटागाडी वापराविना पडून असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी कचरा साचत असल्याने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून खरेदी केलेले वाहन तीन वर्षांपासून वापराविना पडून राहिल्याने त्याची झीज होत असून सार्वजनिक निधीचा हा अपव्यय असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, घंटागाडीचा वापर तातडीने सुरू करावा आणि परिसरातील कचरा व ओढ्यांमधील घाणीची विल्हेवाट लावून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



