*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यात यंदा भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेती क्षेत्रातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर राजापूर तालुक्यातही महसूल व कृषी विभागाकडून पाहणी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनुसार जुवाठी पंचायत समिती गणातील उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भात पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार विकास गंबरे, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, कृषी अधिकारी विद्या पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उन्हाळे परिसरातील भात शेतीची पाहणी करून पिकाची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीचे स्वरूप तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
पाहणीदरम्यान कृषी विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते. प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्यात आल्याने पंचनामे व पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी आवश्यक माहिती संकलित करण्यास मदत होणार आहे.
भात हे राजापूर तालुक्यातील प्रमुख खरीप पीक असून त्यावर मोठ्या संख्येने शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे नैसर्गिक परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य नोंद होऊन पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पाहणी व नुकसानीच्या नोंदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



