*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न,महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न,महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न,महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्थानिक एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता अभियान तसेच वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजविणे, सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी शाळेच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक वंदना जांबिलसा व मनीष पाडवी प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध विषयांवर रंगल्या स्पर्धा जयंतीनिमित्त वर्गनिहाय वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छतेत माझा सहभाग’, ‘विकसित भारताचे पहिले पाऊल’, ‘स्वच्छता हीच सेवा माझे कर्तव्य व जबाबदारी’ तसेच ‘संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांचे स्वच्छतेविषयक विचार’ अशा विविध विषयांवर प्रभावी मनोगत व्यक्त केले. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छतेत माझा सहभाग’, ‘कचऱ्यापासून कलाकृती’, ‘माझी शाळा, स्वच्छ शाळा’, ‘सफाई मित्रांचा सन्मान’, ‘एक झाड आईच्या नावावर’ आणि ‘प्लास्टिकमुक्त भारत’ या विषयांवर मनमोहक चित्रे साकारून आपल्या कल्पकतेची छाप पाडली. वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विजेते प्रथम उन्नती महेंद्र पाटील इयत्ता 8 वी ‘अ’, द्वितीय प्रज्ञा दीपक पावरा इयत्ता 9 वी ‘ब’,तृतीय पल्लवी अनिल पाडवी इयत्ता 9 वी ‘ई’, उत्तेजनार्थ चिराग मधुकर पाडवी इयत्ता 10 वी ‘ब’विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधावा प्राचार्या नूतनवर्षा वळवी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांनी सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, “अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासोबतच त्यांच्यात सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचे संस्कार रुजण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच अशा विविध उपक्रमांत हिरिरीने भाग घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. तसेच त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याया उपक्रमाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उर्मिला मोरे, ललिता पानपाटील व अपर्णा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर दिनेश ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



