*देवळालीप्रवरा प्रसादनगरचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडविणेसाठी आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवळालीप्रवरा प्रसादनगरचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडविणेसाठी आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट*
*देवळालीप्रवरा प्रसादनगरचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडविणेसाठी आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट*
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रसादनगर गट क्र. 542 या 417 आर जागेचा प्रश्न अखेर केंद्राच्या दारात पोहोचला आहे. या जागेवर 50 वर्षांपासून जवळपास 250 गरीब कुटुंबे राहत असून, नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. पल्लवी वैभव ढुस यांचे वतीने सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस व आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सर्किट हाऊस, अहिल्यानगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदास आठवले साहेब यांच्याकडे प्रसादनगरच्या नागरिकांसाठी केंद्रातून PMAY- U 2.0 योजना मंजूर करावी अशी मागणी केली आहे. ढूस यांनी आठवले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादनगर च्या गट क्र. 542 मधील सदर 417 आर चौ. मी. जागा डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची आहे. शासनाने तेथे स्लम (झोपडपट्टी) घोषित केले असून त्या जागेत SC, ST, भटके, ऊसतोड कामगार समाजातील असे जवळपास तब्बल २५*देवळाली प्रवरा - प्रसादनगरचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडविणेसाठी आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांची भेट*
*अहिल्यानगर दि. 02 ऑक्टोबर 2026 (प्रतिनिधी) -* देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रसादनगर गट क्र. ५४२ या ४१७ आर जागेचा प्रश्न अखेर केंद्राच्या दारात पोहोचला आहे. या जागेवर ५० वर्षांपासून जवळपास २५० गरीब कुटुंबे राहत असून, नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. पल्लवी वैभव ढुस यांचे वतीने सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस व आर पी आय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सर्किट हाऊस, अहिल्यानगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदास आठवले साहेब यांच्याकडे प्रसादनगर च्या नागरिकांसाठी केंद्रातून *PMAY-U 2.0 योजना मंजूर करावी* अशी मागणी केली आहे.
ढूस यांनी ना. आठवले साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादनगर च्या गट क्र. ५४२ मधील सदर ४१७ आर चौ. मी. जागा डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची आहे. शासनाने तेथे स्लम (झोपडपट्टी) घोषित केले असून त्या जागेत SC, ST, भटके, ऊसतोड कामगार समाजातील असे जवळपास तब्बल २५० कुटुंबे तेथे ५० वर्षांपासून राहत आहेत.
आजवर या ठिकाणी नगरपरिषदेने शासकीय निधीतून रस्ते, गटार, पथदिवे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सदर जागा कारखान्याला मोकळी करणे किंवा विक्री करणे शक्य नाही.
*कारखान्याच्या सभेतही ठराव*
दि. ३०/०९/२०२६ रोजी झालेल्या कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद श्री. आप्पासाहेब भिमराज ढुस यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून *PMAY-U 2.0 मधील In-situ Slum Redevelopment (AHP/ BLC घटक)* योजना राबवावी व सदर जागा प्रसादनगरच्या रहिवाशांच्या नावे करावी, अशी मागणी ढूस यांनी केली आहे.
*फायदा काय?*
या योजनेमुळे कारखान्याला केंद्राकडून जमिनीचा मोबदला मिळेल.., तसेच जवळपास २५० कुटुंबांना हक्काची जागा व पक्के घर मिळेल.. आणि, देवळाली प्रवरा नगरपरिषद Slum Free होईल, असे ढूस यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
"हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. केंद्राने विशेष बाब म्हणून हा प्रकल्प मंजूर करावा" असे - सौ. पल्लवी वैभव ढुस, नगरसेविका यांचे वतीने आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी ना. आठवले साहेब यांचेशी चर्चा करताना आग्रह धरला. 250 कुटुंबे तेथे 50 वर्षांपासून राहत आहेत. आजवर या ठिकाणी नगरपरिषदेने शासकीय निधीतून रस्ते, गटार, पथदिवे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सदर जागा कारखान्याला मोकळी करणे किंवा विक्री करणे शक्य नाही.
कारखान्याच्या सभेतही ठराव
30 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या कारखान्याच्या 69 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद आप्पासाहेब भिमराज ढुस यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातूनPMAY -U 2.0 मधील In-situ Slum Redevelopment (AHP/ BLC घटक) योजना राबवावी व सदर जागा प्रसादनगरच्या रहिवाशांच्या नावे करावी, अशी मागणी ढूस यांनी केली आहे.
फायदा काय?
या योजनेमुळे कारखान्याला केंद्राकडून जमिनीचा मोबदला मिळेल, तसेच जवळपास 250 कुटुंबांना हक्काची जागा व पक्के घर मिळेल आणि, देवळाली प्रवरा नगरपरिषद Slum Free होईल, असे ढूस यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे."हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. केंद्राने विशेष बाब म्हणून हा प्रकल्प मंजूर करावा" असे सौ. पल्लवी वैभव ढुस, नगरसेविका यांचे वतीने आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी आठवले यांचेशी चर्चा करताना आग्रह धरला.



