*'अभिजात' दर्जा,मग एसटीच्या 'स्मार्ट कार्ड'वर मायबोलीचा विसर का?प्रवाशांच्या अडचणींची दखल घ्या, सवलत ओळखपत्रे'द्विभाषिक' करा-सुराज्य अभियान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'अभिजात' दर्जा,मग एसटीच्या 'स्मार्ट कार्ड'वर मायबोलीचा विसर का?प्रवाशांच्या अडचणींची दखल घ्या, सवलत ओळखपत्रे'द्विभाषिक' करा-सुराज्य अभियान*
*'अभिजात' दर्जा,मग एसटीच्या 'स्मार्ट कार्ड'वर मायबोलीचा विसर का?प्रवाशांच्या अडचणींची दखल घ्या, सवलत ओळखपत्रे'द्विभाषिक' करा-सुराज्य अभियान*
मुंबई(प्रतिनिधी):-एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक व महिलांना मिळणाऱ्या सवलत ओळखपत्रांवर सर्व तपशील केवळ इंग्रजीत असल्याने ग्रामीण नागरिक व ज्येष्ठांची मोठी अडचण होत आहे. याबाबत राज्यभरातून अनेक प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या बाबीला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व सवलत ओळखपत्रे मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक) करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन 'सुराज्य अभियान'तर्फे एसटीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना सादर करण्यात आले. या निवेदनाची तात्काळ नोंद घेत व्यवस्थापकीय संचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात बोलताना 'सुराज्य अभियान' चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे म्हणाले, "महाराष्ट्र राजभाषा नियमांनुसार शासकीय कारभारात मराठीचा वापर अनिवार्य आहे, तसेच केंद्र सरकारने मराठीला 'अभिजात भाषा' दर्जा दिला आहे. हा बहुमान आणि प्रवाशांची अडचण विचारात घेता एसटीची ओळखपत्रे द्विभाषिक करणे आवश्यक आहे. यामुळे स्थानिकांची सोय होऊन राजभाषेचा सन्मानही राखला जाईल." प्रशासकीय स्तरावर मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर या बाबत तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सुराज्य अभियानाने व्यक्त केली आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या, एसटी महामंडळाच्या सर्व सवलत ओळखपत्रांवर प्रवाशांचे नाव, तपशील व नियम मराठी आणि इंग्रजी(द्विभाषिक) अशा दोन्ही भाषांमध्ये मुद्रित करण्यात यावेत.
संगणकीय प्रणालीत आवश्यक तांत्रिक बदल करून देवनागरी (मराठी) लिपीतील माहितीला प्राधान्य देण्यात यावे.



