*बामखेडे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*
*बामखेडे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बामखेडे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.
ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडे त.त. येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भारत मातेच्या दोन्ही सुपुत्रांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील उपस्थित होते, कार्यक्रमाचे वक्ते डॉ.सी.एस. करंके यांनी गांधीजींच्या जीवनातील अनेक प्रसंग उलगडले. व ते कसे प्रेरणादायी यावर मार्गदर्शन केले. तर डॉ. वाय. सी. गावित यांनी शास्त्रीजींच्या शास्त्रीजींचे राजकीय कार्य किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डाॅ. योगेश पाटील यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच .एम. पाटील यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे राजकीय जीवन गरज आणि लोभ यांचा फरक स्पष्ट करणारा सुंदर वस्तुपाठ आहे आणि तत्कालीन जीवनात कसे प्रेरणेचा स्रोत आहे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. एम. एस. निकुंभे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.बी.एन. गिरासे यांनी केले आणि आभार प्रगटन डॉ.के.पी. पाटील यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर बंधू उपस्थित होते.



