*म.गांधी,लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्ताने स्वच्छता अभियानासह,पथनाट्य सादरीकरण,देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेशांद्वारे विखरण गावात जनजागृती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*म.गांधी,लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्ताने स्वच्छता अभियानासह,पथनाट्य सादरीकरण,देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेशांद्वारे विखरण गावात जनजागृती*
*म.गांधी,लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्ताने स्वच्छता अभियानासह,पथनाट्य सादरीकरण,देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेशांद्वारे विखरण गावात जनजागृती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित, आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमा पूजन विखरण ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी केशव पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी केले. विखरण गावातील चौकांमध्ये ग्रामस्वच्छता करण्यात आली. तसेच रॅलीद्वारे विविध घोषवाक्यांच्या गजरात,स्काऊट गाईड, हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी 'एक पाऊल पर्यावरण संवर्धनाकडे' विषयावर पथनाट्यद्वारे विविध समस्या व त्यावर निराकरण करण्यासाठी आजच्या मानवाची भूमिका विद्यार्थ्यांनी संवाद रूपाने ग्रामस्थांसमोर मांडले. महात्मा गांधीजींच्या वेशभूषेमध्ये रुपेश पाटील याने स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाने व इको क्लब व स्काऊट गाईड विभागाचे डी.बी. भारती यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी. व्ही.नांद्रे यांनी सूत्रसंचालन वाय. डी.बागुल तर आभार एम.एस.मराठे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे. एस.पाटील,एस.जी.पाटील एच. एम.खैरनार यांनी परिश्रम घेतले.