*विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन-मा.आ.शिरीष चौधरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन-मा.आ.शिरीष चौधरी*
*विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन-मा.आ.शिरीष चौधरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संत शिरोमणी प. पू. श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र तेली समाजाचे भूषण स्व. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या प्रेरणेने नंदुरबार शहर तेली समाजाच्या वतीने तेली समाजातील विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नंदुरबार तेली समाजाचे अध्यक्ष मा.आ. शिरीष हिरालाल चौधरी यांनी केले आहे. हा समारंभ रविवार 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता श्री गजानन महाराज मंदिर सभागृह, नंदुरबार येथे होणार आहे.
गेल्या 26 वर्षांपासून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. विविध स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत असून, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. या विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन नंदुरबार शहर तेली समाजाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, कार्याध्यक्ष ईश्वर जयराम चौधरी, उपाध्यक्ष सुभाष पुरुषोत्तम चौधरी, सचिव प्रकाश छगन चौधरी, सहसचिव मोहन महादू चौधरी, तेली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धर्मराज मंगा चौधरी, कार्याध्यक्ष प्रा.डॅा. रमेश गोकुळ चौधरी, सचिव रुपेश हिरालाल चौधरी, अनिल रतन चौधरी, तेली महिला मंडळाच्या विभागीय अध्यक्षा सौ डॅा.तेजल विशाल चौधरी, जिल्हाध्यक्षा सौ उमा प्रकाश चौधरी, नंदुरबार शहर अध्यक्षा सौ. मनिषा मनोज चौधरी, कार्याध्यक्षा सौ अनिता शिरीष चौधरी, सचिव सौ माधवी रुपेश चौधरी आणि तेली युवक आघाडीचे कार्याध्यक्ष गौरव बाबूलाल चौधरी, उपाध्यक्ष भूषण राजेंद्र चौधरी, सचिव विशाल गोविंद चौधरी यांनी केले आहे.
कार्यक्रमास हिरा फाउंडेशन, नंदुरबारचे अध्यक्ष डॉ. रविंद्र हिरालाल चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.



