*एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा*
*एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथे आज 1 ऑक्टोबर रोजी 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रकल्पांतर्गत सेवानिवृत्त झालेल्या 65 वर्षांवरील अधिकारी, कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा संपूर्ण सोहळा प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा काळात केलेल्या उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवेबद्दल, तसेच त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्तांना 'गुणगौरव प्रमाणपत्र', पुष्पगुच्छ आणि शाल देऊन अत्यंत भावूक आणि सन्मानपूर्वक वातावरणात गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, सेवा संकल्प अभियाना अंतर्गत आदिवासी विकास विभागातील योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेणेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते प्रकल्प कार्यालयाच्या आवारात सामूहिक वृक्षारोपण करण्यात आले. आपण लावलेले झाड कार्यालयाच्या परिसरात वाढून पुढील पिढीला सावली व ऑक्सिजन देईल, या भावनेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने या वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला. पर्यावरण संवर्धनाचा हा एक स्तुत्य उपक्रम यावेळी राबविण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. चंद्रकांत पवार यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले व त्यांच्या पुढील निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. "ज्येष्ठांचा आदर हीच खरी संस्कृती" हा संदेश देत कार्यालयाने घेतलेल्या या उपक्रमामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अत्यंत आनंद व समाधान व्यक्त केले. या सोहळ्याला सहायक प्रकल्प अधिकारी बी. एफ. वसावे, देवेंद्र पाटील, किरण मोरे, कार्यालय अधीक्षिका श्रीम. कौशल्या पाडवी, विस्तार अधिकारी डी.एच. माळी व एस. एस. पाटील तसेच आदिवासी विकास विभाग सेवानिवृतत अधिकारी/कर्मचारी संघटना नंदुरबार प्रकल्प अध्यक्ष यशवंत ओगले, उपाध्यक्ष विवेक दापुरकर व संयोजक युवराज रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



