*माजी खासदार डॉ.हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक, आढावा पुस्तिकेचे मुख्यमंत्री यांनी केले प्रकाशन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माजी खासदार डॉ.हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक, आढावा पुस्तिकेचे मुख्यमंत्री यांनी केले प्रकाशन*
*माजी खासदार डॉ.हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक,आढावा पुस्तिकेचे मुख्यमंत्री यांनी केले प्रकाशन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील नटावद आणि लगतच्या 10 गावांमध्ये संसदीय संकूल विकास परियोजना अंतर्गत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलेल्या विकास कार्याची पुस्तिका आणि पडद्यावरील सचित्र माहिती पाहिल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंड भरून कौतुक केले, आणि त्यांच्या विकास कार्याला यापुढेही सहकार्य राहील असे भरीव आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत “जन-जातीय संकुल विकास परियोजना, महाराष्ट्र” ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संघटक व्ही. सतीश, डॉक्टर गजानन डांगे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ. भारती पवार तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचे व उपक्रमांचे सादरीकरण करण्याची डॉक्टर हिना गावित यांना संधी मिळाली. नंदुरबारमधील जनजातीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा अनुभव आणि दिशा त्यांनी यावेळी मांडली. तसेच, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील नटावद, खटावद, आरडीतारा, पावला वगैरे दहा गावांमध्ये 2021 पासून 2026 पर्यंत शेती विकास, जलसंवर्धन, सौरसिंचन, फळ लागवड आणि अन्य संदर्भाने योजनांचे लाभ देऊन अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणून स्थलांतर रोखण्याचा उपाय या संसद संकुल परियोजनेतून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या आढावा पुस्तिकेत याची माहिती देण्यात आली आहे.



