*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'माहिती अधिकार कायदा'जनजागृती कार्यक्रम माहिती अधिकार सर्वसामान्यांना हक्क मिळवून देणारे प्रभावी माध्यम-मुकेश देवरे यांचे प्रतिपादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'माहिती अधिकार कायदा'जनजागृती कार्यक्रम माहिती अधिकार सर्वसामान्यांना हक्क मिळवून देणारे प्रभावी माध्यम-मुकेश देवरे यांचे प्रतिपादन*
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'माहिती अधिकार कायदा'जनजागृती कार्यक्रम माहिती अधिकार सर्वसामान्यांना हक्क मिळवून देणारे प्रभावी माध्यम-मुकेश देवरे यांचे प्रतिपादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील एस.ए.एम.ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माहिती अधिकार कायदा जनजागृती व मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याची सविस्तर माहिती देत त्याचा सुजाण व जबाबदार वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मनीष पाडवी आणि पर्यवेक्षिका सौ. प्रतीक्षा वळवी उपस्थित होते.
याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (नंदुरबार) येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे, निलेश शिंदे व सौ. सुवर्णा देवरे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. माहिती मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा, अर्जाचा विहित नमुना, आवश्यक फी, माहिती मिळण्याची कायदेशीर मुदत (प्रत्येक 30 दिवस) तसेच माहिती नाकारल्यास किंवा विलंबाने मिळाल्यास प्रथम व द्वितीय अपिलाची प्रक्रिया कशी असते, याचे साधे आणि सोप्या भाषेत विश्लेषण करण्यात आले. "माहिती अधिकार केवळ शासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी नसून सर्वसामान्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आहे," असा महत्त्वाचा संदेश मार्गदर्शकांनी यावेळी दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी यांनी सांगितले की, "प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक प्राधिकरणांकडून माहिती मिळवण्याचा कायदेशीर हक्क आहे. शासनाच्या विविध योजना, घेतलेले धोरणात्मक निर्णय, विकास कामे, निधीचा विनियोग आणि एकूण प्रशासकीय प्रक्रिया याविषयीची माहिती नियमांनुसार प्राप्त करता येते." अशा जनजागृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सजगता निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन सौ. सुनीता कुंवर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी कर्तव्यांच्या जाणीवेसाठी असे उपक्रम मार्गदर्शक ठरतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



