*परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा, सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार,अपर मुख्य सचिव व्ही. राधा, उच्चस्तरीय टास्क फोर्सचा आतापर्यंत सुमारे 1500 विद्यार्थ्याà¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा, सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार,अपर मुख्य सचिव व्ही. राधा, उच्चस्तरीय टास्क फोर्सचा आतापर्यंत सुमारे 1500 विद्यार्थ्याà¤
*परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा, सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार,अपर मुख्य सचिव व्ही. राधा, उच्चस्तरीय टास्क फोर्सचा आतापर्यंत सुमारे 1500 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद,भरती परीक्षा सुधारण्यासाठी सुमारे 30 हजार सूचनांचे ईमेल प्राप्त*
मुंबई(प्रतिनिधी):-भरती परीक्षा प्रक्रिया सुधारणा हा विषय राज्य शासनाने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. हा विषय अतिशय संवेदनशील असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांनी मांडलेल्या सूचनांचा टास्क फोर्सकडून सकारात्मक विचार केला जाईल, तसेच परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर केला जाईल, असे भरती परीक्षा सुधारणासाठी गठित टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भरती परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी, आदर्श करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भरती परीक्षा सुधारण्यासाठी गठित उच्चस्तरीय समितीने कोकण विभागातील उमेदवारांशी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. यावेळी उच्चस्तरीय समितीचे सदस्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), सदस्य तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.
अपर मुख्य सचिव व्ही. राधा म्हणाल्या, उच्च स्तरीय टास्क फोर्सकडून आतापर्यंत पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी व उमेदवारांशी संवाद साधण्यात आला आहे. कोकण विभागातील संवादानंतर आज (बुधवार) नाशिक विभागात टास्क फोर्स संवाद साधणार आहे. प्रत्येक विभागात वेगळे प्रश्न मांडण्यात आले. प्रत्येक प्रश्न, मुद्याचा सखोल अभ्यास करूनच अहवाल शासनास सादर केला जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने हा टास्क फोर्स गठित केला असून आतापर्यंत सुमारे 1500 विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला असून भरती परीक्षा सुधारण्यासाठी सुमारे 30 हजार सूचनांचे ईमेल प्राप्त झाले असल्याचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्ही. राधा म्हणाल्या, एक अधिकारी म्हणून माझ्यासाठीही हा अनुभव अत्यंत शिकवणारा ठरला आहे. प्रत्येक विभागात काही नवीन प्रश्न समोर आले. कोकण विभागातही काही वेगळे मुद्दे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेतून टास्क फोर्सला मोठ्या प्रमाणात माहिती आणि अनुभव मिळाला आहे. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि त्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. संवादातूनही विविध प्रकारचे प्रश्न समोर आले असून अहवाल तयार करताना याचा निश्चितच उपयोग होणार आहे. व्ही. राधा म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी विविध विभागांच्या परीक्षांशी संबंधित स्वतंत्र समस्याही मांडल्या आहेत. त्यामुळे परीक्षानिहाय आणि विभागनिहाय प्रश्नांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासोबतच संघ लोकसेवा आयोग, इतर राज्यांतील भरती प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. संबंधित विभागांच्या सचिवांशी चर्चा करून समस्यांच्या मुळ कारणांचा शोध घेतला जाईल. केवळ शिफारसी करण्याऐवजी प्रत्यक्ष अडचणी दूर करण्यावर टास्क फोर्सचा भर राहणार आहे. विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचना आणि संवादातून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे भरती परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी, आदर्श करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य वीरेंद्र सिंह, एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांनीही आपले विचार मांडले. कोकण विभागातील संवाद प्रसंगी भरती परीक्षा प्रक्रियेतील दिरंगाई टाळावी, आयोगाकडून विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, परीक्षा पारदर्शक व्हावी, परीक्षा पॅटर्न बदलाबाबत पूर्व कल्पना मिळावी, गट क ची सर्व पदांची भरती एकत्र व्हावी, दोन पदांच्या परीक्षेत अंतर असावे, प्रलंबित परीक्षा लवकर व्हाव्यात, पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे दोन भाग असावेत, वरिष्ठ पदानुसार निकाल जाहीर केला जावा, एक पद एक परीक्षा असावी, प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांचा विचार व्हावा, वर्णनात्मक प्रश्नपत्रिका असावी, एकदाच नोंदणी व शुल्क आकारणी करावी, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, उत्तरतालिका आणि पेपर तपासणी अधिक पारदर्शक असावी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींना वयामध्ये सूट असावी, अशा विविध सूचना करण्यात आल्या.



