*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत खैरवे येथे 302 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ, VJNT बंजारा समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय दाखले, कागदपत्रे व योजनांचा लाभ;तहसील
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत खैरवे येथे 302 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ, VJNT बंजारा समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय दाखले, कागदपत्रे व योजनांचा लाभ;तहसील
*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत खैरवे येथे 302 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ, VJNT बंजारा समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय दाखले, कागदपत्रे व योजनांचा लाभ;तहसील कार्यालय नवापूरचा लोकाभिमुख उपक्रम*
नवापूर(प्रतिनिधी):-“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानांतर्गत तहसील कार्यालय, नवापूर यांच्या वतीने नवापूर तालुक्यातील मौजे खैरवे येथे VJNT बंजारा समाजातील पात्र लाभार्थ्यांसाठी विविध शासकीय सेवा, दाखले तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व सेवा नागरिकांच्या स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देत पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे व योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता कमी होऊन त्यांच्या गावातच विविध सेवा उपलब्ध झाल्या. सदर उपक्रमांतर्गत 65 लाभार्थ्यांना शिधापत्रिका, 35 लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले, 23 लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड, 12 लाभार्थ्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तर 10 लाभार्थ्यांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. तसेच 44 लाभार्थ्यांना संजय गांधी योजना लाभ, 1 लाभार्थ्यास बेबी किट आणि 112 लाभार्थ्यांना इतर विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. अशा प्रकारे एकूण 302 सेवा व योजना लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. शासनाच्या योजना थेट नागरिकांच्या दारी
दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची ओळख करून त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे, दाखले व योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले.
विशेषतः VJNT बंजारा समाजातील नागरिकांसाठी आयोजित या उपक्रमामुळे शासकीय सेवांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली. नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देतानाच पात्रतेनुसार लाभ मिळवून देण्यावर प्रशासनाने भर दिला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमास मौजे खैरवे येथील तसेच परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ गावपातळीवर उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. “शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे” या उद्देशाने अशा लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून,“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होत आहे.
तहसील कार्यालय, नवापूर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शासनाच्या विविध सेवा व योजनांचा थेट लाभ समाजातील पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे.



