*अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या मागणीला यश सावंतवाडी टर्मिनसला निधी मंजूर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या मागणीला यश सावंतवाडी टर्मिनसला निधी मंजूर*
*अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या मागणीला यश सावंतवाडी टर्मिनसला निधी मंजूर*
मुंबई(प्रतिनिधी):-मागील 25 वर्षात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्येत प्रचंढ वाढ झालेली आहे. मात्र कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील चाकरमन्यांना गोव्यातील मडगाव टर्मिनसवर विसंबून राहावे लागत होते, परिणामी आरक्षण कोटा विभागला जायचा व कोकणातील मोठया सणांच्या वेळी मागणी करणाऱ्यांनाच गणपती व शिमगा यासाठी जादा स्पेशल रेल्वे सोडूनही कोकणी माणसाला कन्फम तिकीटच मिळत नव्हते, यासाठी कोकणात टर्मिनस खूप महत्वाचे होते.
प्रवासी संघटनेने सावंतवाडी टर्मिनसचे महत्व ओळखून 16 मे 2023 रोजी सावंतवाडी स्टेशनला प्रत्यक्ष जाऊन स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन, स्टेशनची पाहणी केली व यांना निवेदन दिले व रखडलेल्या टर्मिनसचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याची तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून या कामाचा पाठपुरावा सुरू होता. यासाठीच 13 ऑगस्ट 2026 रोजी प्रवासी संघटनेची कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या मिटींगमध्ये सावंतवाडी टर्मिनसच्या विषयावर प्रकर्षाने चर्चा करण्यात आली व त्यासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली होती त्याला आज यश मिळताना दिसत आहे असे अध्यक्ष शेखर बागवे यांनी सांगितले. याला माजी मंत्री दिपक केसरकर यांनीही दुजोरा दिला आहे.
कोकण रेल्वेच्या विकास आराखड्यामध्ये सावंतवाडी टर्मिनस व महाराष्ट्रातील रेल्वेचे दुहेरीकरण यावर भरीव निधी मिळणे अपेक्षित होते मात्र कोकणातील नेते सक्रीय नसल्याने ते शक्य होताना दिसत नाही. कारण मुंबईत ट्रान्सपोर्ट असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील मेल / एक्सप्रेसची संख्या वाढवायची असेल तर प्रामुख्यांने मुंबई ते सिंधुदुर्गच्या दरम्यानच्या कोकण रेल्वेचे दुहेरीकरण महत्वाचे असल्याचे प्रवासी संघटनेने कोकण रेल्वेला ठणकावून सांगितले होते. शिवाय सावंतवाडी स्टेशन येथे मुंख्य 5 प्लाटफॉर्मसोबतच,रेल्वे यार्ड, पिट लाईन, पिण्याचे पाणी, मेंटनस व साफसफाई यांची व्यवस्था होणे खूप महत्वाचे असल्याचे प्रवासी संघटनेने रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या दिनर्शनास आणून दिले होते. 20 जून 2015 रोजी सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना तत्कालीन मुंख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते सावंतवाडी टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला मात्र हे काम मागील 11 वर्षात पुढे गेलेच नाही. कोकण रेल्वे मार्गावर सुसज्ज टर्मिनस झाल्यास मुंबई ते कोकणाच्या दरम्याने जादा रेल्वे चालवणे सोपे होईल, गणपती व शिमगा हे कोकणातील खूप मोठे सण याला मुंबईतील चाकरमनी लाखोच्या संख्येने कोकणातील आपल्या गावी जातात. मात्र कोकणात टर्मिनस नसल्याने सर्व गणपती स्पे. मडगाव ते मेंगलोर पर्यंत चालवाव्या लागतात परिणामी जादा रेल्वेच्या 350 फेऱ्या चालवूनही कोकणातील चाकरमन्यांना गणपतीचे कन्फम तिकीट मिळतच नव्हते. म्हणून कोकणात टर्मिनस होणे खूप महत्वाचे आहे, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले अन्यथा गणपती बाप्पा कोकणात व सर्व गणपती स्पे. रेल्वे मडगाव व मेंगलोर पर्यत धावतानाच दिसतील. शेवटी उशिरा का होईना प्रवासी संघटनेच्या मागणीला यश येताना दिसत आहे व हे काम टप्प्या टप्याने होईल असे रेल्वे प्रशासनाने सुचवले आहे.



