*मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न, विशेष सखोà¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न, विशेष सखोà¤
*मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे,विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक डॉ.प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न,विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर,अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली असून, अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी नागरिकांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे आणि निवडणूक यंत्रणेला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा आढावा घेण्यासाठी 28 सप्टेंबर 2026 रोजी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार, विधिमंडळ सदस्य तसेच राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची दुरदृष्य प्रणालीव्दारे बैठक घेतली. यावेळी खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष निलेश माळी, जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दिपक पटेल, जिल्हाध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) पप्पु गिरासे, जिल्हाध्यक्ष शिवसेना (उबाठा) अरुण चौधरी, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ए.पी) डॉ. अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( एस.पी ) निलेश पाटील, जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी पप्पु कुरेशी यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेऊन लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सूचना, समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या.
भारत निवडणूक आयोगाच्या 26 सप्टेंबर, 2026 च्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर, 2026 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 31 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर 2026, नोटीस टप्पा तसेच दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026 असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट, 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 1 -अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात 2 लाख 83 हजार 278, 2- शहादा 3 लाख 24 हजार 559, 3- नंदुरबार 3 लाख 1 हजार 830 तसेच 4- नवापूर 2 लाख 70 हजार 178 मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण 11 लाख 59 हजार 845 मतदार असून त्यापैकी 5लाख 83 हजार 198 पुरुष, 5 लाख 76 हजार 633 महिला आणि 14 तृतीयपंथी मतदार आहेत. ज्या मतदारांचे गणनापत्रक (Enumeration Form) बीएलओ (BLO) कडे जमा केलेली नाही अथवा झालेले नाही, अशा 1 लाख 88 हजार 747 मतदारांची नावे 31 ऑगस्ट 2026 च्या प्रारुप यादीत समाविष्ट नाहीत. यात मयत, स्थलांतरित, दुबार नोंद आणि गैरहजर असलेल्या मतदारांचा समावेश आहे. मयत मतदार वगळता एकही पात्र मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या व्यक्तींची नावे समाविष्ट न होण्याच्या संभाव्य कारणासह यादी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालय आणि nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवमतदारांना नाव नोंदणीची संधी,
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना तसेच 19 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना नमुना 6 भरून मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. त्यासाठी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8, तर एखादे नाव वगळण्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी नमुना 7 भरता येणार आहे. हे सर्व अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहेत.
दरम्यान, दावे व हरकती दाखल करताना एकगठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. केवळ वैयक्तिक दावे व हरकती ग्राहा धरले जातील. मात्र, एकाच कुटुंबातील सदस्यांशी संबंधित वैयक्तिक दावे किंवा हरकती एकत्रितपणे सादर करता येतील.
प्रारुप यादी प्रसिद्धी नंतर ज्या मतदारांची नावे मागील मतदार यादीतील नोंदीशी जुळत नाहीत किवा जुळणी प्रक्रियेत विसंगती आढळली आहे. अशा मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यामार्फत नोटिसा बजावल्या जातील व कागदपत्रे पडताळणी अंती निर्णय घेण्यात येईल. लोक प्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 24 अंतर्गत अपिल करण्याची तरतूद आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 24 (अ) अन्वये जिल्हा दंडाधिकारी / जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल आणि दुसरे अपील कलम 24 (ब) नुसार, पहिल्या अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध, मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 27 अन्वये विहित केलेल्या पद्धतीने मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडे अपिल दाखल करता येईल. नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र सुसूत्रीकरण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्राच्या संख्येत वाढ झाली आहे. मुळ मतदान केंद्राची 1 हजार 434 संख्या असून यात नव्याने मंजूरी मिळालेली संख्या 5असून पुर्णत: लगतच्या मतदान केंद्रात समाविष्ट केलेल्या मतदान केंद्राची संख्या 2 तर नव्यानेवाढ झालेल्या मतदान केंद्राची संख्या 3 असे एकूण 1 हजार 437 मतदान केंद्र आहेत. विशेष सखोल पुनरिक्षण कालावधीमध्ये नागरिकांना माहिती देण्यासाठी त्याचप्रमाणे त्याच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर मतदार मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याकरीता टोल फ्री क्रमांक 1950 (सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत) कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच, नागरिकांना बीएलओशी थेट संपर्क साधण्यासाठी 'Book a call With BLO' या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी ECINET ॲपवरील 'Book a call With BLO' या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारसंघनिहाय मदत कक्ष सुरू केले असून, खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथील मदत कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02564-210008 असून टोल फ्री क्रमांक 1950 आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ: 02567-252226, अपर तहसिल कार्यालय, मोलगी 9767341922, अक्राणी 02595-220232, शहादा विधानसभा मतदारसंघ 02565-224500,तळोदा 02567-232367 /9370928595/ 8459600346, नंदुरबार विधानसभा मतदारसंघ 02564-232269, नवापूर विधानसभा मतदारसंघ 02569-295282 हे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.
विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक, नाशिक गेडाम यांनी आवाहन केले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पात्र मतदार आणि Uncollectable वर्गवारीतील नागरिकांनी 31 ऑगस्ट 2026 ते 12 ऑक्टोंबर 2026 दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आपले दावे/हरकती दाखल करावी. तसेच 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या नवमतदारांनी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे.” या करीता आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तहसिल कार्यालयात संपर्क साधून नाव नोंदणी करीता नमुना 6 आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करावा किंवा https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर Online नाव नोंदणी करावी व “या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्यावा." असे जाहीर आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.



