*कुणबी समाजोन्नती संघाच्या 106 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 1 ऑक्टोबरला परळ येथील वाघे हॉलमध्ये समाजबांधवांचा भव्य मेळावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजोन्नती संघाच्या 106 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 1 ऑक्टोबरला परळ येथील वाघे हॉलमध्ये समाजबांधवांचा भव्य मेळावा*
*कुणबी समाजोन्नती संघाच्या 106 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 1 ऑक्टोबरला परळ येथील वाघे हॉलमध्ये समाजबांधवांचा भव्य मेळावा*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या मातृ संघटनेचा 106 वा वर्धापन दिन सोहळा बुधवार, 1 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता परळ येथील वाघे हॉल, कुणबी ज्ञाती गृह येथे उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संघाध्यक्ष अनिल नवगणे भूषविणार आहेत. गेल्या 106 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत कुणबी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसोबतच सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक विकास, आर्थिक उन्नती आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना संघटनेने सातत्याने चालना दिली आहे. प्रबोधनातून समाजाला नवी दिशा आणि संघटनातून विकासाचा नवा विचार देण्याचे कार्य कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून सुरू आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा संदेश या वर्धापन दिन सोहळ्यातून दिला जाणार आहे. या ऐतिहासिक वर्धापन दिन सोहळ्यास कुणबी समाजबांधव, भगिनी, युवा, महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, कुणबी युवा मुंबई, कुणबी महिला मंडळ तसेच कुणबी विवाह सल्लागार मंडळ यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.



