*शासकीय आयटीआय आणि जामिया खाजगी आय.टी.आय अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "रोजगार महाकुंभ"-पंडित दीनदयाल उपाध्यांय रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासकीय आयटीआय आणि जामिया खाजगी आय.टी.आय अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "रोजगार महाकुंभ"-पंडित दीनदयाल उपाध्यांय रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न*
*शासकीय आयटीआय आणि जामिया खाजगी आय.टी.आय अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "रोजगार महाकुंभ"-पंडित दीनदयाल उपाध्यांय रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-आय.टी.आय,डिप्लोमा, दहावी बारावी, पदवी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार आमश्या पाडवी, अक्कलकुवा पोलीस ठाण्याती पोलिस निरीक्षक अर्जुन पटले, जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबार येथील संदीप बोरसे, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, शासकीय आणि खाजगी आय टी आय प्राचार्य, शाह, अकबर पटेल, तसेच काही पदाधिकारी पृथ्वीसिंग पाडवी रोहित चौधरी सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आमश्या पाडवी, अक्कलकुवा हे होते त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. अध्यक्ष यांनी आपल्या भाषणामध्ये या कार्यक्रमामागे सरकारचा काय उद्देश काय आहे हे सांगितले आणि विद्यार्थीनी आपल्या पायावर कसे उभे राहावे आणि आपले कौशल्य विकसित करून स्वतः च्या पायावर उभे राहून रोजगारक्षम बनावे. आणि या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. असे सांगितले. प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक अर्जुन पटले यांनी मुलांना एकच सांगितले की ईमानदारी आणि मेहनतिने कौशल्य विकसित करून रोजगारक्षम बनावे. आणि ऐक चांगले राष्ट निर्माण करावे. तसेच रोजगाराचा मुलाखती साठी विविध कंपनीचे H.R. उपस्थित होते. खालील प्रकारच्या कंपनी येथे उपस्थित होते. विरटन इंडिया प्रा लि.पुणे, फॉर्टुना इंजिनियर प्रा.लि. नाशिक, महेंद्र अँड महेंद्रा नाशिक,एन सी.सी.प्रा.लि. नंदुरबार, युवा शक्ती फाउंडेशन. नवभारत फार्टिलाईजर, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. नंदुरबार, आर्यन इंटरप्राइसेस अहिल्यानगर इत्यादी कंपनी उपस्थित होत्या. या सर्व कंपनीनी विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन ऑफर लेटर दिले. शासकीय आय टी आय येथील गट निर्देशक गोपाल महाजन यांनी सर्व प्रमुख पाहुणे आणि सर्व कंपनीतील H.R यांचे आभार व्यक्त केले. आणि कार्यक्रमाची सांगता केली.



