*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-श्रीराम मंदिर, तिवरे तर्फे देवळे, खालचीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस सचिन रामाणे यांनी केले. यावेळी त्यांनी कुणबी, ओबीसी, जातनिहाय जनगणना आणि समाजासमोरील विविध प्रश्नांवर विचार मांडले. गेल्या अनेक दशकांपासून जातनिहाय जनगणनेचा प्रश्न प्रलंबित असून, हा विषय व्यापक स्तरावर घेऊन जाण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. जिजाऊ सामाजिक संस्थेचे ॲड. महेंद्र मांडवकर यांनी कोकणातील शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड यांनी कुणबी– ओबीसी बांधवांनी संघटित होऊन आपल्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन केले. प्रबोधनकार मारुती काका जोशी यांनी समाजाला आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्यासाठी कृतिशील परिवर्तनाची गरज व्यक्त केली. समाजाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घेऊन सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. तसेच विम्याचे महत्त्व अधोरेखित करताना कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संदेश जगताप यांनी ओबीसी समाजाचा इतिहास, सामाजिक प्रश्न, धार्मिक व सामाजिक शोषण, हंटर आयोगापासून मंडल आयोगापर्यंतचा प्रवास, नॉन-क्रीमी लेयर, सामाजिक व शैक्षणिक स्थिती, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि आरोग्य आणि गेल्या 80 वर्षात देशातील सरकारांनी षडयंत्र करून ओबीसी जातनिहाय जनगणना केली नाही हे प्रकार सत्य ठेवले अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. यावेळी मान्यवरांचे स्वागत पुस्तक भेट देऊन करण्यात आले. तसेच युगपुरुष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत भायजे यांच्या वतीने कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने सामूहिक वृक्षभेट देण्यात आली.
या कार्यक्रमाला कुणबी युवा मुंबईचे माजी युवा अध्यक्ष रामचंद्र पालकर, संदीप आग्रे, गणपत भायजे, चेतन नाईक, रोहित जोशी, पवार, ओवाळकर, डॉ. सचिन भोईर, भारत पवार, अनंत जोशी, अमोल लाड, गुणाजी घडशी, राजाराम गावडे, संतोष चांदे, लांबे, विलास डिके, राजेंद्र मेने, प्रमोद घेवडे, प्रदीप घेवडे, वाडीतील सुरेश रामाणे, रमेश ढवळ, बापू ढवळ, संजय नार्वेकर, अजय रामाणे, रामचंद्र घाणेकर, ॲड. संदीप ढवळ, संजय रामाणे, मारुती रामाणे, गणपत रामाणे, शंकर नार्वेकर, श्रीपत रामाणे, युवा विलास नार्वेकर, संदीप नार्वेकर, पांडुरंग नार्वेकर, प्रसाद सुकम, अनिकेत रामाणे, अभिजीत रामाणे, मंगेश रामाणे, सचिन ढवळ, नागेश नार्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश गावडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा, मार्गदर्शन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून हा मेळावा उत्साहात पार पडला.



