*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कान्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल, नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय अंडर-14 मल्लखांब (मुले व मुली) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. स्पर्धेत शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
अंडर-14 मल्लखांब गटातून (मुले) शौर्य पाडवी, हन्विक हुरेज आणि यश पाटील यांची, तर मुलींच्या गटातुन अंडर-14 रोप मल्लखांब मध्ये कल्याणी तडवी आणि लावण्या कोकणी यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर तालुकास्तरावर चमकदार कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी तसेच प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची कठोर मेहनत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.



