ताजा खबरे:
*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*

  • Share:

*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
नाशिक(प्रतिनिधी):-थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि महा थ्रोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2026 (मुले व मुली) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नाशिक येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲड. राहुल ढिकले होते. उद्घाटन सोहळ्यास थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विश्वास सारंग, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज कोटक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे, ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ, थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव नरेश मान, उपाध्यक्ष कमल गोस्वामी तसेच महा थ्रोबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष एम. यू. मुरारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विविध राज्यांतील खेळाडू, प्रशिक्षक, पंच, क्रीडा पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने क्रीडा संकुलात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महा थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दर्शिल मनोज कोटक आणि सचिव राहुल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीपासून ते प्रत्यक्ष आयोजनापर्यंत अध्यक्ष दर्शिल, मनोज कोटक आणि सचिव राहुल वाघमारे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली.देशातील विविध राज्यांमधून आलेल्या मुला- मुलींच्या संघांना या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. विविध गणवेशातील खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण क्रीडा संकुलाला राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी महा थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दर्शिल मनोज कोटक व सचिव राहुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बालजी पवार, पराग वानखेडे, अमोल सावंत, भास्कर फडतरे, बालाजी पवार, जयदीप तांबवेकर, विशाल पवार, आनंद वाघमारे, बाबासाहेब गायकवाड, गणेश यादव, संदीप जाधव, खलीक शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया ही वर्ल्ड थ्रोबॉल फेडरेशन आणि एशियन थ्रोबॉल फेडरेशनशी संलग्न असून, या राष्ट्रीय स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नाशिकमध्ये आयोजित या 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेमुळे थ्रोबॉल खेळाला चालना मिळत असून खेळाडूंमध्ये संघभावना, शिस्त आणि क्रीडाभावना वृद्धिंगत होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
September, 29 2026
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
September, 29 2026
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
September, 29 2026
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
September, 29 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
September, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज