*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
मुंबई(प्रतिनिधी):-उभी मंदिरी साज श्रुंगार करुनी, देखणे रूप तुझे दिसे शोभूनी, तुझ्या दर्शनासाठी येती भक्त धावुनी, निरंतर राहू दे कृपा तुझी आई ओंजळ दे भरुनी, मालपा डोंगरीची राजमाता सेवा संस्था आयोजित एम.डी. बॉईज नवरात्रौत्सव राजमाता दरबार हनुमान मंदिर जवळ मालपा डोंगरी नं.3 अंधेरी पूर्व येथे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. नवरात्री उत्सवाचे यंदाचे 8 वे वर्षे आहे. मालपा डोंगरीच्या राजमातेचा आगमन सोहळा शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मोठ्या जल्लोषात आणि आनंदातत संपन्न होणार आहे. राजमातेच्या आगमन सोहळ्याचे खास आकर्षण लाईटची सुंदर अशी रोषणाई असणार आहे. राजमातेच्या सर्व भाविक भक्तांनी राजमातेच्या आगमन सोहळ्यात सहभागी होऊन आगमन सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करून शतगुणित करावा असे मालपा डोंगरीची राजमाता सेवा संस्था कडून आपणास मनपूर्वक निमंत्रण करण्यात आले आहे.



