ताजा खबरे:
*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा नाशिकमध्ये बुधवारी उमेदवारांशी थेट संवाद, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार आणि संबंधित घटकांना सूचना व अनुभव मांडण्याची संधी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा नाशिकमध्ये बुधवारी उमेदवारांशी थेट संवाद, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार आणि संबंधित घटकांना सूचना व अनुभव मांडण्याची संधी*

  • Share:

*भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा नाशिकमध्ये  बुधवारी उमेदवारांशी थेट संवाद, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार आणि संबंधित घटकांना सूचना व अनुभव मांडण्याची संधी*
नाशिक(प्रतिनिधी):-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून बुधवारी 30 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील नियोजन भवन सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत हा संवाद होणार आहे. नाशिक जिल्ह्यासह नाशिक महसूल विभागातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ज्ञ आणि संबंधित घटक या संवादात सहभागी होणार आहेत.
समितीमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश,
राज्याच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत पोलिस महासंचालक सदानंद दाते, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह,  पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामस्वामी, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे यांचा समावेश आहे.
या समितीने आतापर्यंत राज्यातील पाचही महसूल विभागांचा दौरा करून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांशी संवाद साधला आहे. नाशिक महसूल विभागाचा दौरा हा समितीचा शेवटचा टप्पा असणार आहे.
परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व अनुभव मांडण्याची संधी,
भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर येणाऱ्या अडचणी, उमेदवारांचे अनुभव, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रश्नपत्रिका व परीक्षा सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण व्यवस्था तसेच परीक्षा पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत या संवादादरम्यान थेट मते व सूचना मांडता येणार आहेत. उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत आहे. प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि उमेदवारांचे अनुभव, त्यांच्या अडचणी तसेच त्यांच्या सूचना या सुधारणांसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह नाशिक महसूल विभागातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले अनुभव, अडचणी आणि सूचना मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरती परीक्षा अधिक विश्वासार्ह, पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवारांसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या प्रक्रियेत नाशिक विभागातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आणि उमेदवारांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
September, 29 2026
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
September, 29 2026
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
September, 29 2026
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
September, 29 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
September, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज