ताजा खबरे:
*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू,12 ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार,16 नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार- जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू,12 ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार,16 नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार- जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*

  • Share:

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू,12 ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार,16 नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार- जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम सुरू आहे. या अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत असून, नोटीस देणे तसेच दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सुधारित वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखा: निवडणूक आयोगाच्या 26 सप्टेंबर 2026 रोजीच्या पत्रान्वये पुनरिक्षणाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली असून, त्यानुसार पुढीलप्रमाणे टप्पे असणार आहेत:
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी: 31 ऑगस्ट 2026 ते 12 ऑक्टोबर 2026, नोटीस टप्पा / दावे व हरकती निकालात काढणे: 31 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026, अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी: 16 नोव्हेंबर 2026,
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारुप मतदार संख्या: 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यात प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ पुरुष 1,45,923, महिला 1,37,347 व तृतीयपंथी 8, असे एकूण 2 लाख 83 हजार 278  मतदार. शहादा विधानसभा मतदारसंघ पुरुष 1,52,801, महिला 1,51,754 व तृतीयपंथी 4, असे एकूण 3 लाख 24 हजार 559 मतदार. नंदुरबार विधानसभा मतदारसंघ पुरुष 1,52,165, महिला 1,49,665, असे एकूण 3 लाख 1 हजार 830  मतदार. नवापूर विधानसभा मतदारसंघ पुरुष 1,32,309 महिला 1,37,867 व तृतीयपंथी 2, असे एकूण 2 लाख 70 हजार 178 मतदार, अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 5 लाख, 83 हजार 198  पुरुष, 5 लाख 76 हजार 633 महिला व 14 तृतीयपंथी, असे एकूण 11 लाख 59 हजार 845  मतदार आहेत.
अनुउपस्थित, स्थलांतरीत, मयत तसेच दुबार मतदाराची माहिती, ज्या मतदारांचे गणनापत्रक (Enumeration Form) बीएलओ (BLO) कडे जमा केलेली नाही अथवा झालेले नाही, अशा 1 लाख 88 हजार 747 मतदारांची नावे 31 ऑगस्ट 2026 च्या प्रारुप यादीत समाविष्ट नाहीत.यात मयत, स्थलांतरित, दुबार नोंद आणि गैरहजर असलेल्या मतदारांचा समावेश आहे. मयत मतदार वगळता एकही पात्र मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या व्यक्तींची नावे समाविष्ट न होण्याच्या संभाव्य कारणासह यादी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालय आणि nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवमतदारांसाठी नाव नोंदणीसाठी सुवर्णसंधी, प्रारुप यादीत नाव नसलेले किंवा 1 ऑक्टोबर 2026 रोजी वा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार या कालावधीत नमुना-6भरून नाव नोंदवू शकतात. नावात दुरुस्तीसाठी नमुना-8 आणि नाव वगळण्यासाठी हरकत घेण्यासाठी नमुना-7 भरता येईल. हे सर्व अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहेत.
तसेच, दावे व हरकती अर्ज एकगठ्ठा दाखल करता येणार नाहीत, केवळ वैयक्तिक किंवा एकाच कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित अर्ज स्वीकारले जातील. कोणत्याही व्यक्ती / संस्थेने एकत्रितपणे सादर केलेले दावे आणि हरकती विचारात घेतले जाणार नाही. परंतू एकाच घरातील, म्हणजेच एकाच कुटूंबाती सदस्यांशी संबंधित एकत्रितपणे सादर केलेले वैयक्तिक दावे / हरकती स्वीकारल्या जातील. दावे व हरकती निकाली काढणे, प्रारुप यादी प्रसिद्धी नंतर ज्या मतदारांची नावे मागील मतदार यादीतील नोंदीशी जुळत नाहीत किवा जुळणी प्रक्रियेत विसंगती आढळली आहे. अशा मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यामार्फत नोटिसा बजावल्या जातील व कागदपत्रे पडताळणी अंती निर्णय घेण्यात येईल. अपिल,
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 24 अंतर्गत अपिल करण्याची तरतूद आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 24 (अ) अन्वये जिल्हा दंडाधिकारी / जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल आणि दुसरे अपील कलम 24 (ब) नुसार, पहिल्या अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध, मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 27 अन्वये विहित केलेल्या पद्धतीने मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडे अपिल दाखल करता येईल. नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र सुसूत्रीकरण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्राच्या संख्येत वाढ झाली आहे. मुळ मतदान केंद्राची 1 हजार 434 संख्या असून यात  नव्याने मंजूरी मिळालेली संख्या 5असून पुर्णत, लगतच्या मतदान केंद्रात समाविष्ट केलेल्या मतदान केंद्राची संख्या 2 तर नव्यानेवाढ झालेल्या मतदान केंद्राची संख्या 3 असे एकूण 1 हजार 437 मतदान केंद्र आहेत. मदत कक्ष (Help Desk) आणि संपर्क,
विशेष सखोल पुनरिक्षण कालावधीमध्ये नागरिकांना माहिती देण्यासाठी त्याचप्रमाणे त्याच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर मतदार मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याकरीता टोल फ्री क्रमांक 1950 (सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत) कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच, नागरिकांना बीएलओशी थेट संपर्क साधण्यासाठी 'Book a call With BLO' या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी  ECINET ॲपवरील 'Book a call With BLO' या सुविधेचा वापर  करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारसंघनिहाय मदत कक्ष सुरू केले असून, खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल, जिल्हाधिकारी नंदुरबार (निवडणूक शाखा) दूरध्वनी 02564-210008,अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ 02567-252226, अपर तहसिल कार्यालय, मोलगी 9767341922, अक्राणी 02595-220232, शहादा विधानसभा मतदारसंघ: 02565-224500, तळोदा 02567-232367 /9370928595/8459600346,
• नंदुरबार विधानसभा मतदारसंघ: 02564-232269, नवापूर विधानसभा मतदारसंघ: 02569-295282, अंतिम मतदारयादी ही दावे व हरकती निकालात काढल्यानंतर 16 नोव्हेंबर, 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.  नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर 2026 दरम्यान आपले दावे किंवा हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दाखल कराव्यात. तसेच नवमतदारांनी नमुना-6 भरून या लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
September, 29 2026
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
September, 29 2026
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
September, 29 2026
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
September, 29 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
September, 29 2026

थोडक्यात बातमी

*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
September, 29 2026
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
September, 29 2026
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
September, 29 2026
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
September, 29 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
September, 29 2026

थोडक्यात बातमी

*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
September, 29 2026
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
September, 29 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज