*सूक्ष्म सिंचनासाठी विशेष अर्ज नोंदणी मोहीम, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सूक्ष्म सिंचनासाठी विशेष अर्ज नोंदणी मोहीम, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
*सूक्ष्म सिंचनासाठी विशेष अर्ज नोंदणी मोहीम, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्य शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) योजनेच्या अनुषंगाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष अर्ज नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना व सेवांचा थेट लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकाधिक शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळावा आणि उपलब्ध निधीचा प्रभावी विनियोग व्हावा, यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण या योजनेंतर्गत अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देय आहे. सन 2026 -27 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणात या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. अर्ज सादर करतांना अचूक माहिती भरावी जेणेकरुन अर्ज रद्द होणार नाही. अर्ज सादर करतांना Farmer ID स्वतःच्या मालकीचा 7/12, 8अ, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. तसेच आधार क्रमांकचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येईल व निवड झालेनंतर शेतकऱ्यांना लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे अधिकृत वितरकांकडून ट्रॅक्टर / औजारे खरेदी करता येईल. ट्रॅक्टर / औजारे खरेदी झाल्यानंतर उप कृषि अधिकारी / मंडळ कृषि अधिकारी यांचेमार्फत मोका तपासणी होऊन शेतकरी यांचे आधार लिंक बँक खात्यावर अनुदान वर्ग होते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर मोहिमेमध्ये सहभाग घेवुन अर्ज नोंदणी करावी. सदर मोहिमेदरम्यान कृषि विभागातील मंडळ कृषि अधिकारी व उप कृषि अधिकारी यांचे मार्गदशनाखाली सर्व सहाय्यक कृषि अधिकारी प्रत्येक गावात मेळावे आयोजित करुन योजनेची माहिती देणार आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व CSC केंद्रावर संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त शेतकरी यांनी अर्ज नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, शंकर किरवे यांनी केले आहे.



