*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या यश ठाकरेची क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी, भाला फेकमध्ये द्वितीय,थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक, व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय निवडीचा मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या यश ठाकरेची क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी, भाला फेकमध्ये द्वितीय,थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक, व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय निवडीचा मान*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या यश ठाकरेची क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी, भाला फेकमध्ये द्वितीय,थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक, व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय निवडीचा मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथील विद्यार्थी यश ठाकरे याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 2026 विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक तर थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावत त्याने उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. यासोबतच यश ठाकरे याची व्हॉलीबॉलसाठी राज्यस्तरीय निवड झाली आहे.मैदानी क्रीडा प्रकारांसह सांघिक क्रीडा प्रकारातही उल्लेखनीय कामगिरी करत त्याने आपल्या अष्टपैलू क्रीडा कौशल्याची प्रचिती दिली आहे.
यश ठाकरेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील व प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी अभिनंदन केले. त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.